Shikhar Dhawan Dancing On Punjabi Song Video: शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज संघ शुक्रवारी (२८ एप्रिल) आयपीएल २०२३च्या ३८ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा सामना करेल. गेल्या तीन सामन्यांसाठी धवनच्या जागी सॅम करण संघाचे नेतृत्व केले आहे. मात्र, त्याच्या नेतृत्वाखालील संघाची कामगिरी चांगली झाली असून पंजाबने दोन सामने जिंकले आहेत. शिखर धवन एलएसजीविरुद्धच्या आगामी सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल की नाही याबाबत कोणतीही ठोस माहिती नाही. दरम्यान, धवनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर नक्कीच चर्चेत आहे, ज्यामध्ये तो भांगडा करताना दिसत आहे.
आयपीएलच्या १६व्या हंगामात डावखुरा फलंदाज धवनची बॅट चांगली चालली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांमध्ये ११६.५० च्या प्रभावी सरासरीने १४६.५४ च्या स्ट्राईक रेटने २३३ धावा केल्या आहेत. धवनच्या अनुपस्थितीमुळे निश्चितच संघाचा समतोल बिघडला असून त्याचे लवकरात लवकर संघात पुनरागमन व्हावे, अशी चाहत्यांची इच्छा आहे.
मात्र, संघाबाहेर असूनही धवन चाहत्यांचे मनोरंजन करायला विसरला नाही. शुक्रवारी डावखुरा फलंदाज धवनने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामावर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो संघसहकारी अर्शदीप सिंग आणि हरप्रीत ब्रारसह पंजाबी गाण्यावर भांगडा करताना दिसत आहे. यादरम्यान धवनने स्वतः अर्शदीप आणि हरप्रीतप्रमाणे डोक्यावर पगडी बांधली आहे. त्याचबरोबर ते खूप एन्जॉय करत आहे. तिन्ही खेळाडू पंजाबी गाण्यावर आपल्या डान्स करत आहेत.
दोन्ही संघ –
पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), अर्शदीप सिंग, बलतेज सिंग, राहुल चहर, सॅम कुरान, ऋषी धवन, नॅथन एलिस, गुरनूर ब्रार, हरप्रीत ब्रार, हरप्रीत सिंग, विद्वत कवेरप्पा, लियाम लिव्हिंगस्टोन, मोहित राठी, प्रभसिमरन सिंग, कागिसो रबाडा , भानुका राजपक्षे, एम शाहरुख खान, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम सिंग, मॅथ्यू शॉर्ट, सिकंदर रझा, अथर्व तायडे.
हेही वाचा – RR vs CSK: राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या ‘या’ कृत्याबद्दल धोनीला मोठा पश्चाताप, रॉबिन उथप्पाने केला खुलासा
लखनऊ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुडा, कुणाल पांड्या, अमित मिश्रा, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), नवीन उल हक, आयुष बडोनी, आवेश खान, करण शर्मा, युधवीर चरक, यश ठाकूर, रोमॅरियो शेफर्ड, मार्क वुड, स्वप्नील सिंग, मनन वोहरा, डॅनियल सायम्स, प्रेरक मंकड, कृष्णप्पा गौतम, जयदेव उनाडकट, मार्कस स्टोइनिस, रवी बिश्नोई, मयंक यादव.