Virat Kohli and Kagiso Rabada Video Viral : आयपीएल २०२४ मधील ५७ वा सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकणे दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचे आहे. हा सामना गमावणारा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. या सामन्यापूर्वी पंजाबचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि आरसीबीचा फलंदाज विराट कोहली यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही व्हिडीओ क्लिप रबाडाच्या पॉडकास्टदरम्यानची आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विलो टॉक पॉडकास्टमध्ये कोहलीची अचानक एन्ट्री –

वास्तविक, कागिसो रबाडा विलो टॉक पॉडकास्टमध्ये बोलत होता. ज्यामध्ये विराट कोहली अचानक पोहोचला. खरंतर, पॉडकास्टदरम्यान विराट रबाडाच्या लॅपटॉपच्या मागे होता. तेव्हा रबाडा म्हणतो, विराट कोहली तिथे नाचतोय. रबाडा विराटला सांगतो की, मी पॉडकास्टवर आहे. ज्यावर कोहलीने विचारले कोणासोबत? यानंतर उत्तर देताना रबाडा म्हणाला तो विलो टॉकशी बोलत आहे.

त्यानंतर रबाडाने कोहलीला कॅमेऱ्यासमोर येण्याचे आमंत्रण दिले. यानंतर विराट कोहली कॅमेरासमोर येतो आणि सर्व प्रेक्षकांना अभिवादन करतो. यादरम्यान कोहली थोडा विनोदही करतो. या पॉडकास्टचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांना खूप आवडला आहे.

हेही वाचा – SRH vs LSG : सनराझर्स हैदराबादने रचला इतिहास! ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्माने लावली विक्रमांची रांग

धर्मशाला येथे पंजाब-आरसीबी आमनेसामने येणार –

पंजाब किंग्ज आणि आरसीबी आज धर्मशाला मैदानावर आपला-आपला १२ वा सामना खेळाणार आहेत. या हंगामात आतापर्यंत आरसीबीने ११ सामन्यांपैकी केवळ ४ सामने जिंकले आहेत. आरसीबीला प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर हा सामना कोणत्याही परिस्थित जिंकावा लागेल. याशिवाय पंजाब किंग्जने ११ पैकी ४ सामने जिंकले आहेत. पंजाबसाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. यापूर्वी हे दोन संघ आमनेसामने आले होते, तेव्हा आरसीबीने विजय मिळवला होता. गुणतालिकेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ ८ गुणांसह सातव्या स्थानावर आहे, तर पंजाब किंग्ज संघ ८ गुणांसह आठव्या स्थानावर आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of virat kohli and kagiso rabadas podcast before punjab kings vs royal challengers bangalore match goes viral vbm