Virat Kohli and Sourav Ganguly shaking hands Video Viral: विराट कोहली आणि सौरव गांगुली भारतीय क्रिकेटचे मोठे दिग्गज आणि माजी कर्णधार आहेत. मात्र या दोन दिग्गजांमध्ये मागील काही काळापासून सुरू असलेला वाद जगापासून कधीच लपून राहिलेला नाही. पण आयपीएल २०२३ च्या ५० व्या सामन्यात जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ दिल्ली कॅपिटल्ससमोर होता, तेव्हा दृश्य वेगळे होते. आरसीबी सामना हरला पण शेवटी दादा आणि विराटने हस्तांदोलन करुन लाखो चाहत्यांची मने जिंकली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
गांगुली आणि विराटने हस्तांदोलन केले –
आरसीबीच्या पराभवानंतर विराट आणि गांगुली यांच्यात भेट होईल असे कुणालाही वाटले नव्हते. परंतु जेव्हा आरसीबी आणि डीसीचा सामना संपल्यानंतर जेव्हा खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत होते, तेव्हा विराट सौरव गांगुलीसमोर आला. तेव्हा या दोन्ही खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन केले आणि यादरम्यान एकमेकांच्या खांद्यावर हातही ठेवला. यानंतर चाहते मोठ्या संख्येने खूश दिसले.
गेल्या वेळी हस्तांदोलन केले नव्हते –
मात्र, गेल्या वेळी हे दोन दिग्गज एकमेकांसमोर आले तेव्हा त्यांनी हस्तांदोलन केले नव्हते. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यानंतर पुन्हा एकदा गांगुली आणि विराटमधील कर्णधार वादाची चर्चा सुरु झाली होती. मात्र, आता परिस्थिती थोडी बदललेली दिसत आहे.
इन्स्टावरही अनफॉलो केले होते –
हस्तांदोलनच्या घटनेनंतर विराट कोहलीने सौरव गांगुलीला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले. मिळालेल्या माहितीनुसार, याआधी विराट सौरव गांगुलीला इन्स्टाग्रामवर फॉलो करायचा. पण नंतर या खेळाडूने गांगुलीला त्यांच्या फॉलोलिस्टमधून काढून टाकले आहे. नंतर गांगुलीने स्वतःही तेच केले आणि विराटला त्याच्या फॉलोलिस्टमधून काढून टाकले.
हेही वाचा – ODI WC 2023: “जर भारताने ‘ही’ लेखी हमी दिली, तर आम्ही भारतात येऊ”; पाकिस्तानची भारतासमोर मोठी अट
सामन्याबद्दल बोलायचे तर, आयपीएलच्या ५० व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध विजय मिळवला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर डीसीने आरसीबीचा सात विकेट्स राखून पराभव केला. आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरूने २० षटकांत ४ गडी गमावून १८१ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीने १६.४ षटकांत तीन विकेट गमावत १८७ धावा करून सामना जिंकला.