Rashid Khan Playing Gully Cricket: राशिद खानला भारतीय चाहत्यांचे खूप प्रेम मिळते. यामुळेच तो चाहत्यांसोबत बराच वेळ घालवतो. आयपीएलच्या या शानदार हंगामात चाहत्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूंना भेटण्याची संधी मिळत आहे. यादरम्यान गुजरात टायटन्सचा राशिद खान चाहत्यांना भेटला. तो लहान मुलांसोबत रस्त्यावर गल्ली क्रिकेट खेळला, त्याचा हा व्हिडिओ सर्वांनाच फार आवडत आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राशिद खान लहान मुलांसोबत मैदानात क्रिकेट खेळताना दिसत आहे. त्या व्हिडिओत तो फलंदाजी करत असून जोरदार फटके मारत आहे. हा व्हिडीओ कुठल्या आणि कोणत्या शहराचा आहे असे वाटत असेल तर गुजरातच्या गांधीनगर येथील आहे. गुजरातच्या चाहत्यांना त्याची स्टाइल खूप आवडली आहे, लोक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुकही करत आहेत. यावेळी राशिद खानला तिथे असलेल्या एका तरुणाने विचारले की, “अफगाणिस्तानमध्ये आणखी किती लेग-स्पिनर किंवा मनगट-स्पिनर आहेत?” यावर अफगाणिस्तानचा माजी कर्णधार म्हणाला, “खरे सांगायचे तर आता येथे हजाराहून अधिक फिरकीपटू आहेत. मी तिथल्या काही अकादमींमध्ये गेलो आणि तिथे बरेच लेग स्पिनर होते.”
राजस्थान विरुद्धच्या राशिद खानची सामन्यात शानदार कामगिरी
राजस्थान रॉयल्स विरुद्ध ४ षटकात अवघ्या १४ धावा देऊन ३ महत्त्वपूर्ण विकेट्स घेणारा लेगस्पिनर राशिद खानने फलंदाजांना त्याच्या फिरकीची भीती का वाटते हे पुन्हा एकदा दाखवून दिले. राशिद आपली बॉलिंग अॅक्शन इतकी जबरदस्त ठेवतो की त्याचा हात पाहून फलंदाजाला अंदाज येत नाही की तो लेग स्पिन खेळणार आहे की गुगली! फलंदाजांचा पडणारी शंकाच राशिदला यश मिळवून देते. राशिद खान, रॉयल्सविरुद्ध गुजरातच्या विजयाचा नायक ठरला, त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. त्यावेळी त्याने सांगितले की, गेल्या काही सामन्यांमध्ये धावा काढल्यानंतर, त्याने आपल्या गोलंदाजीत तीच धार आणण्यासाठी नेटमध्ये अधिक सराव केला आहे.
‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब घेण्यासाठी आलेला राशिद म्हणाला, “मी काही वेगळे केले नाही, फक्त निर्णय घेतला की मी फलंदाजाला असे कोणतेही हावभाव करायचे नाही, जेणेकरून तो मला पकडू शकेल. माझा लेग स्पिन आणि गुगली यातील फरक कमी करण्याचा मी प्रयत्न करतो. मी बॉल दोन्ही वेळेस सारखाच धरतो. मी नेटमध्ये त्याचा सतत सराव करतो जेणेकरून मला ते परिपूर्ण करता येईल. माझा हात नेहमी लपवतो त्यामुळे फलंदाजाच्या मनात द्विधावस्था तयार होते आणि त्याचा फायदा मला होतो.”
पुढे तो म्हणाला, “कधी कधी मी माझ्या लाईन आणि लेंथपासून भरकटतो. जर मी माझ्या लाइन आणि लेंथमध्ये सातत्य ठेवू शकलो तर मला माहित आहे की फलंदाजाला फटका मारणे कठीण जाईल. मला प्लॅन साधा ठेवायचे आहे. सामन्यात मी काय चूक करतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे मला माझ्या लाईन आणि लेंथवर अधिक काम करावे लागेल. मी काही खराब चेंडू टाकले होते आणि त्यामुळे मला धावा पडल्या, म्हणून मी त्यावेळी ड्रेसिंग रुममध्ये आलो आणि व्हिडिओ विश्लेषकांशी बोललो त्यांनी माझ्या खेळपट्टीवरील लाईनवर काम केले.
याशिवाय त्याने त्याचा सहकारी खेळाडू नूर अहमदसोबतच्या गोलंदाजीतील भागीदारीबाबतही चर्चा केली. यंग नूर, जो एक अफगाण खेळाडू आहे, राशिदशी त्याची मातृभाषा पश्तोमध्ये त्याच्याशी बोलतो, ज्यामुळे त्याला खेळाच्या मागण्या समजून घेणे सोपे होते. यावर राशिद म्हणाला, “हे काम सोपे करते, आम्ही खेळादरम्यान पश्तोमध्ये बोलतो. मी त्याच्यासोबत आहे याचा नूरला आनंद झाला. तो एक असा खेळाडू आहे जो माझं नेहमी ऐकतो आणि त्यावर कठोर परिश्रम करतो. तो म्हणाला, “माझ्या पहिल्या आयपीएलनंतर जवळपास २५० लेगस्पिनर अफगानिस्तानमधील अकादमीमध्ये आले होते. मी गेल्या ६-७ वर्षांपासून आयपीएल खेळत आहे आणि तेथे बरेच फिरकीपटू आहेत जे मला कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. मला रोज नवीन लेग स्पिनर्सचे व्हिडिओ येतात. नूर येथे परफॉर्म करताना पाहून मला खूप आनंद झाला. कैस अहमद, झहीर खान सारखे इतरही अनेक आहेत, ज्यांना अद्याप आयपीएलमध्ये संधी मिळालेली नाही, पण जेव्हा त्यांना संधी मिळेल तेव्हा तेही चांगली कामगिरी करतील.”