IPL 2023 KKR vs PBKS Highlights: आयपीएलमध्ये कोलकाताच्या इडन गार्डनवर पंजाब किंग्जविरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स सामन्यात नितीश राणा आणि रिंकू सिंगच्या बळावर केकेआरने दमदार विजय मिळवला. ईडन गार्डन्सवरील सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. पंजाब किंग्जने मैदानावर १८० धावांचे लक्ष्य ठेवले होते. केकेआरचा कर्णधार नितीश राणाने झळकावलेल्या अर्धशतकाने संघाची स्थिती उत्तम होती मात्र पंजाबच्या फिरकीपटूंचे समीकरण शेवटच्या चार षटकांत इतके अप्रतिम जुळले होते की केकेआरवर चांगलाच दबाव बनला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंद्रे रसेलने आधी नॅथन एलिसच्या गोलंदाजीवर १५ धावा केल्या आणि नंतर शेवटच्या षटकात सॅम कुरनच्या चेंडूवर तीन षटकार मारले. पंजाबच्या बाजूने गोलंदाजी करताना अर्शदीपने सुद्धा प्रचंड मेहनत घेतली होती. चौथ्या चेंडूवर ऑफच्या बाहेर यॉर्कर मारून रसेलला बाद करण्याचा त्याने प्रयत्न केला पण तेव्हा डीप फिल्डर पॉईंटने रसेल दोन धावा करू शकला. तरीही अर्शदीपने आपला प्लॅन कायम ठेवत पुन्हा तसाच बॉल टाकला यावेळी रसेलचा ताळमेळ चुकल्याने तो धाव बाद झाला. यानंतर केकेआरच्या विजयाची जबाबदारी रिंकूच्या खांद्यावर आली .

शेवटच्या चेंडूवर, अर्शदीपने फुल्ल टॉस टाकला असताना रिंकूने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बॅट फिरवली. यावेळी डीपवर असलेल्या क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला, पण रिंकूच्या दमदार शॉटने बॉल पार सीमारेषेच्या बाहेर गेला होता. रिंकूने दणक्यात मॅच संपवतात ईडन गार्डन्सच्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांनी आणि मैदानात केकेआरच्या संघाने एकच जल्लोष केला पण त्याच मैदानावर अर्शदीप निराश झाला. षटकात सहा धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरल्याने त्याचे डोळे पाणावले होते. याचा एक व्हिडीओ सुद्धा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

Video: रिंकूने अर्शदीपला चौकार मारताच…

दरम्यान, दोन्ही संघ पॉइंट टेबलच्या मध्यभागी अडकले आहेत. येथे पराभूत झाल्यामुळे पंजाब संघाचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग कठीण झाला आहे. तर शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर रिंकू सिंगने चौकार मारून संघाला विजयी केले व केकेआरच्या प्लेऑफच्या आशा पुन्हा पल्लवित केल्या.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video rinku singh hits massive four on last ball arshdeep singh cries in match kkr vs pbks match highlights ipl 2023 point table svs
Show comments