IPL 2023, GT vs PBKS: गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुरुवारी पंजाब किंग्जविरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यादरम्यान गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आपल्याच संघातील खेळाडूवर रागावताना दिसला. हार्दिक पांड्याने आपल्याच संघातील खेळाडूशी केलेल्या वाईट वर्तवणुकीवरील व्हिडिओवर सोशल मीडियात खळबळ उडाली आहे. हार्दिक पांड्याचं हे वर्तन त्याच्याच खेळाडूशी असं कसं? असा सवाल चाहते ट्विटरवर करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

LIVE मॅचमध्ये हार्दिक पांड्या आपल्याच खेळाडूवर रागावताना दिसला

मोहालीत गुरुवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात पंजाब किंग्जच्या फलंदाजीदरम्यान कर्णधार हार्दिक पांड्याने डावाच्या २०व्या षटकात वेगवान गोलंदाज जोशुआ लिटिलकडे चेंडू सोपवला. हे षटक सुरू होण्यापूर्वी गुजरात टायटन्सचा संघ निर्धारित वेळेत षटक पूर्ण करू शकला नाही. दरम्यान, शेवटच्या षटकाचा दुसरा चेंडू टाकण्यापूर्वी डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण करणारा मोहित शर्मा त्याच्या स्थितीपासून थोडासा दूर उभा होता.

व्हिडिओ व्हायरल होताच खळबळ उडाली

२९ वर्षीय हार्दिक पांड्याला डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण करणार्‍या मोहित शर्माचा राग आला, जो त्याच्या स्थानापासून थोडासा दूर उभा होता. कर्णधार हार्दिक पांड्या ३४ वर्षीय खेळाडू मोहित शर्माला हातवारे करत आक्रमक स्वरात काहीतरी बोलताना दिसला. हार्दिक पांड्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सलामीवीर शुबमन गिलच्या शानदार गोलंदाजीनंतर ६७ धावांच्या अर्धशतकाच्या बळावर गतविजेत्या गुजरात टायटन्सने गुरुवारी आयपीएल सामन्यात पंजाब किंग्जचा एका चेंडू राखून सहा गडी राखून पराभव केला. सुरुवातीचे धक्के आणि गतविजेत्या गुजरात टायटन्सच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर पंजाब किंग्ज संघाला घरच्या मैदानावर आठ विकेट्सवर केवळ १५३ धावाच करता आल्या. गिलच्या ४९ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराने खेळलेल्या खेळीनंतरही गुजरात टायटन्सने १९.५ षटकांत विजय मिळवला.

हेही वाचा: Rohit Sharma politician: गळ्यात गोफ, राजकारणी पेहराव अन् म्हणे पचास तोला; रोहितचा नवा लुक सोशल मीडियावर व्हायरल, पाहा Video

धोनीचे चाहते नाराज

हार्दिक पांड्या म्हणाला, ”खरं तर मला शेवटच्या षटकापर्यंत सामना घेऊन जाणे मला अजिबात आवडत नाही. जितक्या लवकर सामना तो संपवता येईल तेवढ ते चांगल असत आणि मी तसा प्रयत्न करत असतो. हार्दिकच्या याच विधानावरून धोनीचे चाहते नाराज झाले. आज अखेरच्या षटकापर्यंत सामना गेला आणि नशीब आम्ही तो जिंकला. शेवटच्या षटकापर्यंत सामना घेऊन जाणे हा धोका पत्करायचा नाही. मधल्या षटकांत फटकेबाजी करायला हवी. जेणेकरून अखेरच्या षटकापर्यंत सामना जाणार नाही.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video this action of hardik pandya created a ruckus in the live match the storm came as soon as the video went viral avw
Show comments