Virat Kohli on impact player rule in IPL 2024 : आयपीएल २०२४ च्या हंगामात ‘इम्पॅक्ट प्लेअर’ या नियमाबाबत बरीच चर्चा झाली आहे. भारतीय कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा फलंदाज रोहित शर्माने या नियमाशी पहिल्यांदा असहमत दर्शवली होती. त्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर नियमाबाबत वाद सुरू झाला. या नियमाचे समर्थन करणारे काही खेळाडू होते. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज विराट कोहलीनेही या वादात उडी घेतली आहे. त्याने रोहित शर्माच्या मताशी सहमती दर्शवली आहे. कारण या नियमाबद्दल रोहित शर्माला जे वाटते, तेच विराट कोहलीला वाचते आयपीएलच्या शेवटच्या हंगामापासून या नियमाचा वापर सुरु झाला होता.

‘इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळे संतुलन बिघडते’ –

जिओ सिनेमाशील बोलताना विराट कोहली म्हणाला, “मी रोहितच्या मताशी सहमत आहे. मनोरंजन हा खेळाचा एक पैलू आहे, पण त्यात समतोल असायला हवा. या नियमामुळे खेळाचा समतोल बिघडला आहे आणि मलाच नव्हे तर अनेकांना असे वाटते.” काही दिवसांपूर्वी रोहितने एका पॉडकास्टमध्ये असेही म्हटले होते की, तो या नियमाचा समर्थक नाही. कारण त्याचा परिणाम अष्टपैलू खेळाडूंवर होत आहे. भारतीय संघाचे दोन दिग्गज खेळाडू या नियमाच्या विरोधात आहेत.

कोहलीने गोलंदाजांबद्दल व्यक्त केली सहानुभूती –

आयपीएलच्या या हंगामात आठ वेळा २५० हून अधिक धावा झाल्या असून कोहलीला गोलंदाजांच्या वेदना समजतात. तो म्हणाला, “गोलंदाजांना काय करावे असा प्रश्न पडतो. मी कधीच पाहिले नाही की प्रत्येक चेंडूवर चार-सहा धावा देतील, असे गोलंदाजांना वाटत असेल. प्रत्येक संघात बुमराह किंवा राशिद खान नसतो. अतिरिक्त फलंदाजामुळे, मी पॉवरप्लेमध्ये २०० प्लसच्या स्ट्राइक रेटने खेळत आहे. कारण मला माहित आहे की आठव्या क्रमांकावरही एक फलंदाज आहे. क्रिकेटमध्ये वरच्या स्तरावर असे वर्चस्व नसावे, असे माझे मत आहे. बॅट आणि बॉलमध्ये समान संतुलन असावे.”

हेही वाचा – IPL 2024 : BCCI ची हार्दिक पंड्यावर मोठी कारवाई! पुढील हंगामातील पहिल्याच सामन्यात खेळण्यावर घातली बंदी

इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा पुनर्विचार केला जाऊ शकतो –

इम्पॅक्ट प्लेअर नियमाबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान, नुकतेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांचे विधानही समोर आले होते, ज्यात त्यांनी म्हटले होते की हा नियम कायमस्वरूपी नाही आणि भविष्यात त्याचा पुनर्विचार केला जाऊ शकतो. एका सामन्यात दोन भारतीय खेळाडूंना संधी मिळावी यासाठी हा नियम एक प्रयोग म्हणून लागू करण्यात आल्याचे जय शाह यांनी सांगितले होते. यावर कोहली म्हणाला, “मला खात्री आहे की जयभाई यांनी सांगितले की ते पुनर्विचार करतील आणि मला खात्री आहे की अशा निष्कर्षापर्यंत पोहोचेल की खेळात संतुलन निर्माण करता येईल. क्रिकेटमध्ये केवळ चौकार किंवा षटकार रोमांचक नसतात. १६० धावा करून विजय मिळवणे देखील रोमांचक असते.”

Story img Loader