Virat Kohli and Henrik Klaassen create a record: आयपीएल २०२३ चा ६५ वा सामना आरसीबी आणि एसआरएच संघांत खेळला गेला. या सामन्यात आरसीबीचा संघासाठी विजय खूप महत्त्वाचा होता. कारण प्लेऑफमधील आपला दावा बळकट करण्यासाठी आरसीबीला सामना जिंकण्याची आवश्यकता होती. त्यामुळे विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी शानदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यांत विराटने शतक झळकावत सामना एकतर्फी केला. तत्पुर्वी प्रथम फलंदाजी हैदराबाद संघाकडून हेनरिक क्लासेननेही शतक झळकावले होते. या सामन्यात विराट आणि हेनरिकने एक विक्रम रचला.

या सामन्यात प्रथम फंलदाजी करताना एसआरएचने हेनरिक क्लासेनच्या शतकाच्या जोरावर १८६ धावांचा डोंगर उभारला. ज्यामध्ये क्लासेनने ५१ चेंडूंत १०४ धावांचे योगदान दिले होते. प्रत्युत्तरादाखल, आरसीबीने १९.२ षटकांत दोन विकेट गमावत १८७ धावांचे लक्ष्य पार केले. या डावात विराट कोहलीने आरसीबीकडून शतक झळकावले. त्याने ६४ चेंडूत १०० धावांचे योगदान दिले, ज्यामुळे बंगळुरुने हैदराबादवर ८ गडी राखून विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात विराट आणि हेनरिकने आयपीएलच्या इतिहासातील एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Virat Kohli Depicted as Clown in Australian Newspaper After on-field bust up with Sam Konstas in Melbourne IND vs AUS
IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…
Tire killer is going to be tested in three important areas of Thane railway station area
स्थानक परिसरात लवकरच ‘टायर किलर’
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ

कोहली आणि क्लासेनने मिळून रचला इतिहास –

या सामन्यात विराट कोहलीने हैदराबादविरुद्धच्या दुसऱ्या डावात ६३ चेंडूंमध्ये १०० धावा केल्या, तर हेन्रिक क्लासेनने पहिल्या डावात आरसीबीविरुद्ध ५१ चेंडूंत जोरदार १०४ धावा केल्या. सामन्यात दोन्ही संघांच्या फलंदाजांनी शतकं झळकावण्याची आयपीएलच्या इतिहासातील ही पहिली वेळ होती. यापूर्वी आयपीएल सामन्यांमध्ये दोन शतके झळकावली आहे, परंतु एकाच संघातील खेळाडूंनी हा कारनामा केला होता.

हेही वाचा – Gujarat Titans: हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशाच्या संघांत रंगला सामना; नाणेफेकीचा मजेशीर VIDEO होतोय व्हायरल

आरसीबीचे फलंदाज विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांनी २०१६ मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध शतके झळकावली होती. त्यानंतर हैदराबादचे फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी २०१९ मध्ये आरसीबीविरुद्ध शतके झळकावली होती, परंतु २०२३ साली पहिल्यांदाच असे घडले. जेव्हा दोन्ही फलंदाजांनी एकाच सामन्यात एकमेकांच्या संघांविरुद्ध शतक झळकावले आहे.

हेही वाचा – SRH vs RCB: “आज कोहलीने १०० धावा करून इतके नाटक केले, जसे…”, विराटच्या शतकानंतरच्या सेलिब्रेशनवर केआरकेची टीका

एकाच आयपीएल सामन्यात दोन शतके झळकावणारे फलंदाज –

१. विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स (आरसीबी) विरुद्ध गुजरात लायन्स, बंगळुरु, २०१६
२. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो (एसआरएच) विरुद्ध आरसीबी, हैदराबाद, २०१९
३. विराट कोहली (आरसीबी) विरुद्ध हेनरिक क्लासेन (एसआरएच), हैदराबाद, २०२३

Story img Loader