Virat Kohli Naveen Ul Haq Face Off Again: आयपीएल २०२३ चे ६२ सामने पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत प्लेऑफमध्ये पोहोचलेला गुजरात टायटन्स हा एकमेव संघ आहे. तर दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. पण प्लेऑफमधील उर्वरित तीन स्पॉट्ससाठी अनेक संघांमध्ये अजूनही लढत आहे. त्याचबरोबर या संघांमध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचीही नावे आहेत. पण जर हे दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचले तर चाहत्यांना पुन्हा एकदा विराट कोहली आणि नवीन-उल-हक मैदानावर आमनेसामने सामना पाहायला मिळतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराट-नवीनच नवीन आमनेसामने दिसणार –

गेल्या वेळी लखनौ आणि आरसीबीचे संघ आमनेसामने आले तेव्हा बराच गदारोळ झाला होता. सामन्यानंतर विराट कोहली आणि लखनौचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक यांच्यात वादावादी झाली होती. लखनऊचा मार्गदर्शक गौतम गंभीरनेही या वादात उडी घेतली होती. पण तुम्हाला माहीत आहे का की विराट आणि नवीन पुन्हा एकदा मैदानावर एकमेकांसमोर येऊ शकतात. यासाठी लखनऊ आणि आरसीबीचे संघ एकत्र प्लेऑफचे तिकीट कसे मिळवून शकतील हे जाणून घ्या.

लखनऊ आणि बंगळुरु एकत्र प्लेऑफमध्ये कसे पोहोचतील?

सध्या आयपीएलच्या गुणतालिकेत १२ सामन्यांनंतर लखनऊचा संघ १३ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे आरसीबीबद्दल बोलायचे झाले, तर हा संघ १२ सामन्यांत १२ गुणांसह ५व्या क्रमांकावर आहे. मंगळवारी लखनऊचा संघ मुंबईशी भिडणार आहे. लखनौच्या संघाने हा सामना जिंकल्यास त्यांचे १५ गुण होतील आणि ते तिसऱ्या क्रमांकावर पोहोचतील. त्याचवेळी, यानंतर १३ सामन्यांत मुंबई संघाचे केवळ १४ गुण राहतील.

हेही वाचा –

आरसीबीलाही दोन्ही सामने जिंकावे लागतील –

इतकंच नाही तर इथून मुंबईचा संघ आपल्या शेवटच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाशी भिडणार आहे. या सामन्यातही मुंबईचा संघ पराभूत झाला तर त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचणे कठीण होईल. त्याच वेळी, आरसीबी आणि लखनौला मोठ्या प्रमाणात प्लेऑफमध्ये पोहोचणे सोपे होईल. मात्र यासाठी आरसीबीला त्यांच्या शेवटच्या दोन साखळी सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स संघांचा पराभव करावा लागेल. यासह आरसीबीचे १६ गुण होतील आणि चांगल्या धावगतीने हा संघ अंतिम ४ मध्ये पोहोचेल.

पंजाब किंग्जही शर्यतीत –

आरसीबीप्रमाणेच पंजाब किंग्जलाही अंतिम ४ मध्ये पोहोचण्याची संधी आहे. हा संघ १२ सामन्यांत १२ गुणांसह ८व्या स्थानावर आहे. पंजाबचेही केवळ दोन साखळी सामने शिल्लक असून त्यांनाही १६ गुण मिळण्याची चांगली संधी आहे. परंतु त्याचा नेट रनरेट निगेटिव्ह आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli and naveen ul haq are likely to face each other once again and what is the equation for that vbm