बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स वि आरसीबी यांच्यात सामना खेळवला आला. ज्यामध्ये आरसीबीवर दिल्लीने ४७ धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर सर्व खेळाडू एकमेकांना हात मिळवण्यासाठी पुढे सरकत होते. तितक्यात सौरव गांगुली आणि विराट कोहली आमनेसामने आले, ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. गेल्यावर्षी म्हणजेच आयपीएल २०२३ मध्ये दिल्ली वि. आरसीबीच्या सामन्यानंतर एकमेकांना हात न मिळवताच निघून गेले होते. या दोघांच्या वागण्यावरून खूपच चर्चा रंगली होती. मात्र या सामन्यानंतर दोघांनी एकमेकांना हात मिळवला, ज्याचा व्हीडिओ समोर आला आहे.
दिल्ली कॅपिटल्सचे संचालक सौरव गांगुली यांनी आरसीबीविरुद्धच्या सामन्यानंतर सर्व खेळाडूंना भेटण्यासाठी मैदानात उतरले. आयपीएल २०२४ च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी दोन महत्त्वाचे गुण महत्त्वाचे असल्याने दोन्ही संघांना विजय मिळवणे आवश्यक होते. सामन्यानंतर गांगुली आणि विराट कोहली भेटले असता दोघांनीही एकमेकांशी हस्तांदोलन केले. ज्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. गेल्यावर्षीच्या आयपीएलमध्ये या दोघांमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू होती.
हेही वाचा – IPL 2024: १८ धावा किंवा १८.१ षटके… आरसीबी की चेन्नई कोण गाठणार प्लेऑफ, वाचा कसं आहे समीकरण?
पण यंदा मात्र एकमेकांना हात मिळवत या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. गांगुलीने विराट समोर येताच कॅप काढत त्याला हात मिळवला, ज्यावरून कोहलीला सन्मान दिल्याने गांगुलीचं कौतुक केलं जात आहे. तर कोहलीने दिल्लीच्या खेळाडूंना भेटताना आधीच आपली कॅप काढली होती. गांगुलीने विराटला हात मिळवता त्याच्याशी बोलताना दिसला. कदाचित संघाच्या चांगल्या खेळासाठी त्यांचे कौतुक करत आहे असे वाटले.
दिल्लीविरूद्धच्या विजयानंतर आरसीबीच्या प्लेऑफच्या आशा वाढल्या आहेत. आरसीबीने उत्कृष्ट कामगिरी करत सलग पाच सामने जिंकले आहेत आणि पाचव्या स्थानी पोहोचले आहेत. आता संघाचा पुढील आणि शेवटचा सामना चेन्नईविरूद्ध खेळवला जाणार आहे, गणितीय समीकरणानुसार आरसीबीने चेन्नईवर विजय मिळवला तर कोहलीचा संघ प्लेऑफमध्ये नक्कीच धडक मारू शकतो.