Virat Kohli record 250 matches for any team in IPL : आयपीएल २०२४ मधील ६२ व्या सामन्यात विराट कोहलीने आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला. आयपीएलमध्ये कोणत्याही एका संघाकडून २५० सामने खेळणारा विराट पहिला क्रिकेटर ठरला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली. एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये प्रवेश करताच विराटने हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला. विराट सध्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहे. आयपीएलच्या या हंगाामात कोहलीने ६०० हून अधिक धावा केल्या आहेत. आरसीबी अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे.
विराट कोहलीने आयपीएलमध्ये रचला इतिहास –
आयपीएल या स्पर्धेला २००८ मध्ये सुरुवात झाली आहे . विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून आरसीबीकडून खेळत आहे. आयपीएलमध्ये २५० सामने खेळणारा तो एकूण चौथा खेळाडू ठरला आहे. विराटच्या आधी महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) आयपीएलमध्ये २६३ सामने खेळला होता. धोनीनंतर रोहित शर्मा दुसरा खेळाडू आहे. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहितने आयपीएलमध्ये २५६ सामने खेळले आहेत, तर आरसीबीचा यष्टिरक्षक दिनेश कार्तिक २५५ आयपीएल सामने खेळून तिसऱ्या क्रमांकावर आहे.
विराट कोहलीची आयपीएलमधील कामगिरी –
विराट कोहलीने आरसीबीसाठी २५० आयपीएल सामन्यांमध्ये ७९०६ धावा केल्या आहेत, ज्यात ८ शतके आणि ५५ अर्धशतकांचा समावेश आहे. विराटने आयपीएलमध्ये १३१.६८ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याची सरासरी ३८.७५ इतकी आहे. आयपीएलच्या चालू हंगामात कोहलीने १३ सामन्यांमध्ये सर्वाधिक ६४३ धावा केल्या आहेत, ज्यात एक१ शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात कोहलीला इशांत शर्माने बाद केले. वैयक्तिक २७ धावांवर इशांतने कोहलीला यष्टिरक्षक अभिषेक पोरेलकरवी झेलबाद केले.
हेही वाचा – RCB vs DC : विराट चौकार-षटकार मारून होता डिवचत, इशांतने आऊट केल्यानंतर घेतला असा बदला, VIDEO होतोय व्हायरल
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० षटकांत ९ गडी गमावून १८७ धावा केल्या. बंगळुरूसाठी हा करा किंवा मरा असा सामना आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी त्यांना दिल्लीला १८७ पेक्षा कमी धावांवर रोखावे लागेल. मात्र, चिन्नास्वामी स्टेडियमवर लक्ष्याचा बचाव करणे सोपे नाही. बंगळुरूसाठी, कॅमेरून ग्रीनने २४ चेंडूत ३२ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. तर रजत पाटीदारने ५२ धावांची तर विल जॅकने ४१ धावांची खेळी साकारली. दिल्लीकडून खलील अहमद आणि रसिख दार सलमा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर इशांत शर्मा, मुकेश कुमार आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.