आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ५४ वी लढत चांगलीच अटीतटीची ठरली. या सामन्यात बंगळुरु संघाने हैदराबादवर ६७ धावांनी मात केली. या सामन्यात बंगळुरु संघाने हैदराबादसमोर १९३ धावांचे आव्हान उभे केले. ही धावसंख्या उभारताना फिनिशर म्हणून ओळख असलेला दिनेश कार्तिक याने थक्क करुन टाकणारी फलंदाजी केली. त्याने अवघ्या ८ चेंडूंममध्ये ३० धावा केल्या आहेत. त्याच्या या फलंदाजीने विराट कोहलीदेखील प्रभावित झाला आहे.

हेही वाचा >>> वनिंदू हसरंगा, फॅफ डू प्लेसिसने केली कमाल; बंगळुरुचा दणदणीत विजय, हैदराबादचा लाजिरवाणा पराभव

३३ धावा करुन ग्लेन मॅक्सवेल झेलबाद झाल्यानंतर दिनेश कार्तिक फलंदाजीसाठी आला होता. दिनेश कार्तिक जेव्हा मैदानात उतरला तेव्हा अवघे आठ चेंडू शिल्लक होते. त्यामुळे मैदानात उतरताच त्याने आक्रमक पद्धतीने फलंदाजी केली. शेवटच्या षटकातील दोन चेंडूंवर फॅफ डू प्लेसिसने तीन धावा केल्या. त्यानंतर मात्र स्ट्राईकवर आलेल्या दिनेश कार्तिकने चार चेंडूंमध्ये एकापाठोपाठ तीन षटकार आणि एक चौकार लगावला. त्याने अवघ्या चार चेंडूंमध्ये २२ धावा केल्या. तर पूर्ण डावात त्याने चार षटकार आणि एक चौकार लगावत आठ चेंडूंमध्ये ३० धावा केल्या.

हेही वाचा >>> ग्लेन मॅक्सवेलची कमाल! हैदराबादच्या सलामीवीरांना पहिल्याच षटकात शून्यावर केलं बाद

त्याच्या या खेळाला पाहून गोल्डन डकवर बाद झालेला विराट कोहली चांगलाच प्रभावित झाला. विराट कोहलीने कार्तिकचे कौतुक केले. ड्रेसिंग रुमममध्ये विराट कोहली दिनेश कार्तिकसमोर थेट नतमस्तक झाला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला.

हेही वाचा >>> दिल्ली कॅपिटल्ससमोर दुहेरी संकट,दिग्गज फलंदाज पृथ्वी शॉ पडला आजारी; केलं रुग्णालयात दाखल

दरम्यान, या सामन्यात वीस षटकांमध्ये बंगळुरु संघाने १९२ धावा केल्या. तर या धावांचा पाठलाग करताना हैदराबाद संघ १२५ धावांपर्यंतच पोहोचू शकला. या सामन्यात बंगळुरुच्या वनिंदू हसरंगाने पाच बळी घेतले.

Story img Loader