IPL 2023 MI vs RCB Match Updates:आयपीएल २०२३ मधील पाचवा सामना रविवारी आरसीबी आणि मुंबई इंडियन्स संघात पार पडला. या सामन्यात आरसीबीने माजी कर्णधार विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईला ८ विकेट्सने धूळ चारली. त्याचबरोबर या हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला. दरम्यान सामन्यात विराट कोहलीने मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माचा एक मोठा विक्रम मोडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराट कोहली आता आयपीएलमध्ये भारतासाठी सर्वाधिक वेळा सर्वात जलद अर्धशतक करणारा खेळाडू बनला आहे. कोहलीने रविवारी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये वादळी खेळी केली. विराट कोहलीने ४९ चेंडूचा सामना करताना नाबाद ८२ धावांची खेळी साकारली. त्याच्या या खेळीत ६ चौाकार आणि ५ षटकारांचा समावेश होता.

विराट कोहलीने रोहित शर्माचा विक्रम मोडला –

आयपीएलच्या इतिहासात विराट कोहलीने १५० प्लसच्या स्ट्राईक रेटने अर्धशतक पूर्ण करण्याची ही २३वी वेळ होती. आतापर्यंत हा विक्रम भारतासाठी रोहित शर्माच्या नावावर होता, ज्याने २२ वेळा आयपीएलमध्ये १५० प्लसच्या स्ट्राईक रेटने अर्धशतके झळकावली आहेत. या यादीत तिसरे नाव महेंद्रसिंग धोनीचे आहे, ज्याने हा पराक्रम १९ वेळा केला आहे, तर सुरेश रैनानेही आयपीएलमध्ये १९ वेळा झंझावाती अर्धशतक पूर्ण केले आहे.

हेही वाचा – IPL 2023 CSK vs LSG: एमएस धोनीला विराट-रोहितच्या स्पेशल क्लबमध्ये सामील होण्याची सुवर्णसंधी; फक्त ‘इतक्या’ धावांची गरज

उजव्या हाताचा फलंदाज विराट कोहलीने रविवारचा दिवस सुपर संडेमध्ये बदलला. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध नाबाद ८२ धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १६७ पेक्षा जास्त होता. विजयी षटकार देखील विराट कोहलीच्या बॅटमधून आला. त्याने अर्शद खानला लाँग-ऑनवर षटकार लगावला. आरसीबीने हा सामना ८ विकेटने जिंकला.

विराट पहिला भारतीय ठरला –

विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात भारतासाठी ५० वेळा ५० पेक्षा जास्त वेळा धावा करणारा खेळाडू ठरला आहे. विराटने आयपीएलमध्ये आतापर्यंत २२४ सामन्यांच्या २१६ डावांमध्ये सर्वाधिक ६७०६ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये तो ३३ वेळा नाबाद राहिला आहे. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर ५ शतके आणि ४५ अर्धशतके आहेत. इंडियन प्रीमियर लीगमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या ११३ धावा आहे. २००८ पासून तो सातत्याने आरसीबी संघाचा भाग आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli broke rohit sharmas record and became the player to most score the fastest fifty in ipl vbm
Show comments