Virat Kohli Makes New Record In IPL : इंडियन प्रीमियर लीग असो वा टीम इंडियाचा मंच विराट कोहली एका मोठ्या मुक्कामवर पोहोचला आहे. विराट कोणत्या ना कोणत्या विक्रमाला गवसणी घालताना दिसत आहे. दिल्लीचा घरेलू मैदान अरुण जेटली स्टेडियममध्ये विराटने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. विराटने या इनिंगमध्ये १२ धावा केल्यानंतर आयपीएलमध्ये त्याच्या सात हजार धावा पूर्ण झाल्या आणि असा प्रराक्रम करणारा इतिहासातील पहिला फलंदाज बनला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अक्षर पटेलच्या दुसऱ्या षटकात विराटने एक धाव काढून हा मोठा विक्रम केला. सामन्याआधी या धावांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला १२ धावांची आवश्यकता होती. हे मोठं यश मिळवण्यासाठी विराटला आता त्याच्या बालपणीचा मित्र शिखर धवनशी सामना करावा लागत आहे. पंजाबचं नेतृत्व करणाऱ्या शिखर धवननेही २१३ सामन्यांमध्ये ६५३६ धावा केल्या आहेत. विराटनंतर तो अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्यानंतर वॉर्नर (६१८९) धावा करून तिसऱ्या स्थानावर आहे. तर रोहित शर्मा (६०६३) चौथ्या नंबरवर आहे.

नक्की वाचा – …म्हणून विराट कोहली बनला जगातील नंबर वन फलंदाज, मैदानात ‘त्या’ व्यक्तीचे धरले पाय, Video होतोय व्हायरल

विराटचा धवनसोबत सुरु असलेला संघर्ष धावांसाठी नाहीय. दोघांमध्ये अर्धशतकांवरून जोरदार लढत सुरु आहे. विराटने या सामन्यात सात हजार धावा पूर्ण करून लीगमध्ये ५० वं अर्धशतक ठोकलं. धवनने ४९ अर्धशतक ठोकून कोलहीसोबत रेस सुरु केली आहे. पण वॉर्नरने आतापर्यंत ५९ अर्धशतक ठोकल्याने तो अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे धवनसह विराटसमोरही वॉर्नरचा विक्रम मोडण्याचं आव्हान असणार आहे.