Indian Premier League 2025 Opening Ceremony Updates: आयपीएलचा १८ वा सीझन म्हणजेच आयपीएल २०२५ ला सुरूवात झाली आहे. ईडन गार्डन्सवर यंदाच्या आयपीएलचा सलामीचा सामना खेळवला जात आहे. गतविजेते कोलकाता नाईट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना खेळवला जात आहे. या सामन्यापूर्वी ईडन गार्डन्सवर ओपनिंग सेरेमनी झाली. अनेक कलाकारांनी आपल्या परफॉर्मन्सने ओपनिंग सेरेमनीची शोभा वाढवली. पण विराट कोहलीच्या शाहरूख खानबरोबर डान्सने महफिल लुटली.

आयपीएल २०२५ ची ओपनिंग सेरेमनी ईडन गार्डन्सवर पार पडली. ईडन गार्डन्स हे कोलकाता नाईट रायडर्स संघाचं होम ग्राऊंड आहे. या ओपनिंग सेरेमनीची सुरूवात शाहरूख खानने केली. शाहरूख खान हा केकेआर संघाचा सहमालक आहे. शाहरूख खानच्या भाषणानंतर कार्यक्रम सुरू झाले. यामध्ये गायिका श्रेया घोषाल, बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनी आणि रॅपर-गायक करन औलुजा यांनी वेगवेगळे परफॉर्मन्स सादर केले.

वरील कलाकारांच्या परफॉर्मन्सनंतर शाहरूख खान पुन्हा एकदा स्टेजवर आला. यानंतर शाहरूख खानने आयपीएलचा १८ वा सीझन पूर्ण झाला याबद्दल सांगितले. यानंतर विराट कोहलीला स्टेजवर बोलावलं. विराट कोहली हा आतापर्यंतच्या आयपीएलच्या सर्व १८ सीझनमध्ये खेळणारा खेळाडू आहे. तर या १८ वर्षात तो फक्त एकाच संघाकडून म्हणजडेच आरसीबीकडून खेळला आहे, ही कामगिरी करणारा विराट एकमेव खेळाडू आहे. यासह विराट कोहली हा वरिष्ठ खेळाडू आहे तर केकेआरचा रिंकू सिंग हा नव्या दमाचा खेळाडू आहे.

शाहरूख खानने विराट कोहली आणि रिंकू सिंग यांना स्टेजवर बोलावलं आणि गप्पा मारल्या. विराट कोहली स्टेजवर येताच चाहत्यांनी एकच कल्ला केला. चाहत्यांबरोबर शाहरूखने देखील कोहली कोहलीचे नारे लावले. यानंतर रिंकू सिंगने शाहरूख खानबरोबर ‘लुट पुट गया’ या गाण्यावर डान्स केला. तर नंतर शाहरूखने विराटला त्याच्या पठाण या चित्रपटातील झुमे जो पठाण या गाण्यावर डान्स करायला लावलं. विराटनेही त्याच्या या गाण्याची हुक स्टेप करत शाहरूखबरोबर डान्स केला.

IPL 2025 Opening Ceremony BCCI Officials Cutting 18 Years Cake
आयपीएल २०२५ ओपनिंग सेरेमनी

यानंतर शाहरूख खानने बीसीसीआयच्या सर्व पदाधिकाऱ्यांना स्टेजवर बोलावलं. यामध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव देवजीत सैकिया, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, आयपीएलचे चेयरमन अरूण धुमाळ, खजिनदार प्रभतेज भाटिया यांचा समावेश होता. यानंतर आयपीएलमध्ये सातत्याने १८ सीझन खेळल्याबद्दल विराटला आयपीएल १८ चा मोमेंटो देण्यात आला. त्यानंतर आयपीएलला १८ वर्ष झाल्याने केक कापण्यात आला.

आयपीएल २०२५ ची नाणेफेक झाली असून आरसीबीच्या संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर केकेआरचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आहे. केकेआरचे नेतृत्त्व अजिंक्य रहाणेकडे आहे तर आरसीबीचे नेतृत्त्व रजत पाटीदारच्या खांद्यावर असणार आहे.

Story img Loader