Fans Chanting Kohli Kohli In Front Of Gautam Gambhir : एलिमिनिटेर सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा ८१ धावांनी पराभव केला होता. मुंबईचा विजय झाल्यानंतर लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीर मुंबई इंडियन्सचे मेंटॉर सचिन तेंडुलकरला मैदानात भेटला आणि दोघांनी एकमेकांशी संवाद साधला. परंतु, याचदरम्यान विराट कोहलीच्या चाहत्यांनी पुन्हा एकदा गंभीरला डीवचण्याचा प्रयत्न केला. गंभीर सचिनसोबत चर्चा करत असताना चाहत्यांनी कोहली कोहेलीच्या घोषणा दिल्या. त्यामुळे मैदानात या सामन्यातही नवीन रोमांच पाहायला मिळाला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत सचिन आणि गंभीर एकमेकांसोबत चर्चा करताना दिसत आहेत. त्याचवेळी चाहते कोहली कोहलीचा नारा लावत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. सचिनला हा आवाज ऐकू आल्यानंतर कोणत्याही प्रकारची रिअॅक्शन दिली नाही. तसंच गंभीरनेही चाहत्यांकडे दुर्लक्ष केल्याचं दिसत आहे. आयपीएलच्या या हंगामात कोहली आणि गंभीरच्या वादाने संपूर्ण क्रिडाविश्वात खळबळ उडाली होती. ज्यावेळी हा प्रकार उघडकीस आला, त्यानंतर झालेल्या लखनऊच्या प्रत्येक सामन्यात चाहत्यांनी जोर लावून कोहली कोहलीच्या घोषणा दिल्या.
इथे पाहा व्हिडीओ
नवीन उल हक आणि गौतम गंभीर या दोघांनी कोहलीच्या चाहत्यांनी धारेवर धरल्याचे व्हिडीओ समोर आले. या एलिमिनेटर सामन्यात मुंबईने लखनऊचा ८१ धावांनी पराभव केला. मुंबईने लखनऊसमोर १८२ धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यानंतर लखनऊच्या संघाला फक्त १०१ धावाच करता आल्या. त्यानंतर शुक्रवारी झालेल्या क्वालिफायर २ सामन्यात गुजरातने मुंबईचा पराभव करून आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला. २८ मे ला चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात फायनलचा महामुकाबला होणार आहे.