IPL 2025 Virat Kohli Pranked by RCB Teammates Video: राजस्थान रॉयल्स वि. आरसीबी यांच्यात १३ एप्रिलला झालेल्या सामन्यात विराट कोहली आणि फिल सॉल्टने संघाला सहज विजय मिळवून दिला. विराट कोहली आणि फिल सॉल्ट या जोडीने संघाच्या विजयाचा पाया रचला आणि विराटने शेवटपर्यंत नाबाद राहत आरसीबीचा विजय निश्चित केला. मात्र, सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ड्रेसिंग रूममध्ये विराटबरोबर असं काही घडलं ज्यामुळे तो पण चकित झाला.
राजस्थानविरूद्धच्या सामन्यानंतर विराट कोहलीबरोबर टीम डेव्हिड आणि संपूर्ण आरसीबीच्या संघाने प्रँक केला. खरंतर, सामन्यानंतर, त्याची किटबॅग पॅक करत असताना, कोहलीला जाणवले की त्याची एक बॅट यात नसल्याचे कळलं. आरसीबी संघाने या घटनेचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
विराट कोहली जयपूरला राजस्थानविरूद्ध सामन्यासाठी ७ बॅट घेऊन आला होता. पण सामन्यानंतर त्याची किट बॅग पॅक करताना त्याच्याकडे फक्त ६ बॅट असल्याचं त्याला जाणवलं. त्याची बॅट काही चोरीला गेली नव्हती. उलट, विराटचा सहकारी टिम डेव्हिडने त्याच्याबरोबर एक प्रँक केला होता. टिम डेव्हिडने आधीच विराटची एक बॅट त्याच्या किटबॅगमध्ये लपवून ठेवली होती.
आरसीबीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, कोहली किट पॅक करताना थोडा टेन्शनमध्ये असल्याचे दिसून आले. व्हिडिओमध्ये तो म्हणताना दिसतोय की सात बॅट घेऊन आलो होतो, एक बॅट कुठे दिसत नाहीये. नंतर, एका सहकारी खेळाडूच्या मदतीने, विराट कोहलीला कळतं की त्याची बॅट टिम डेव्हिडच्या बॅगेत आहे. विराट जाऊन टीमच्या किट बॅगमधून बॅट काढतो आणि तपासून पाहतो.
कोहली बॅट मिळाल्यानंतर त्याच्या सर्व सहकाऱ्यांना मस्करीत शिव्या घालत बोलतो की तुम्हाला सर्वांना माहिती होतं ना… विराट बॅट घेताना पाहून डेव्हिड म्हणतो. या प्रँकनंतर टिम डेव्हिड म्हणाला, ‘विराट खूप चांगली फलंदाजी करत होता. म्हणून आम्ही विचार केला की त्याचे एक बॅट हरवली आहे हे त्याला कळायला किती वेळ लागतो ते पाहूया. त्याला हे कळलं सुद्धा नाही कारण तो त्याच्या कामगिरीवर खूप खूश होता. म्हणून मी त्याला बॅट परत दिली.
??? ?????’? ????? ?? ????? ????? ? ?
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 14, 2025
Dressing room banter on point. What did Tim David take from Virat’s bag? Let’s find out. ?#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2025 pic.twitter.com/j9dIP1p2Np
विराट कोहलीने राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या सामन्यात एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. विराटने ६२ धावांची नाबाद खेळी करत आरसीबीला ९ विकेट्सने विजय मिळवून दिला. हे त्याचे टी-२० मधील १००वे अर्धशतक होते. हा टप्पा गाठणारा तो जगातील दुसरा आणि भारतातील पहिला खेळाडू ठरला. याशिवाय,त्याने आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत २४८ धावा केल्या आहेत आणि तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत ५ व्या क्रमांकावर आला आहे.