IPL 2025 CSK vs RCB Virat Kohli Khaleel Ahmed: आयपीएलमधील अजून एक बहुप्रतिक्षित सामना म्हणजे चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू. हा सामना चेपॉकच्या मैदानावर खेळवला जात आहे. जिथे आरसीबीने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत १९६ धावा केल्या. संघाचा कर्णधार रजत पाटीदारने शानदार अर्धशतक झळकावले. तर विराट कोहली आणि फिल सॉल्टने चांगली सुरूवात करून दिली. पण या सामन्यात विराट कोहलीने सुरूवातीलाच खलील अहमदला डोळे दाखवले, नेमकं काय घडलं पाहूया.
चेन्नई सुपर किंग्ससमोर विराट कोहली वेगळ्याच अंदाजात दिसला. कोहलीबरोबर सलामीला आलेल्या फिल सॉल्टने आकर्षक फटके मारले. तर सीएसकेसाठी नव्या चेंडूने गोलंदाजी करणारा खलील अहमद उत्कृष्ट लयीत गोलंदाजी करत होता. त्याने पहिल्याच षटकात विराट कोहलीशी पंगा घेतला.
चेपॉकच्या मैदानावर चेन्नईचा वेगवान गोलंदाज खलील अहमद चांगल्याच फॉर्मात आहे. खलीलने पहिल्याच चेंडूवर विराटला टाकलेला चेंडू पॅडवर जाऊन आदळला आणि खलील अहमदने पंचांच्या निर्णयापूर्वी सेलिब्रेट करण्यासाठी धावत गेला. पण विराटला खात्री होती की तो बाद नव्हता. तर धोनीनेही ऋतुराज गायकवाडला रिव्ह्यू घेण्यास सांगितले. रिव्ह्यूमध्ये बॅटला चेंडू न लागल्याचे दिसले, पण बॉल ट्रॅकिंगमध्ये चेंडू पिचिंग आऊटसाईड ऑफ असल्याने विराट नाबाद राहिला.
यानंतर विराट कोहलीला बाऊन्सर लागल्याने तो शॉट खेळू शकला नाही. यावर खलील अहमद क्रीझवर जाऊन उभा राहिला आणि त्याच्याकडे बघू लागला. याच्या प्रत्युत्तरात कोहलीनेही त्याला डोळे दाखवले आणि मग खलील पुढे निघून गेला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी खलीलला ट्रोल केले आहे.
No khaleel no bro? pic.twitter.com/krvrVH1FU5
— Naeem (@1eight_18) March 28, 2025
आरसीबीने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजीसाठी उतरला. फिल सॉल्ट १६ चेंडूत ३२ धावा करत बाद झाला. तर विराट कोहलीने ३० चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह ३१ धावा केल्या. तर देवदत्त पडिक्कलनेही छोटी पण प्रभावी खेळी केली. त्याने १४ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २७ धावा केल्या आहेत. यानंतर कर्णधार रजत पाटीदारने ३२ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५१ धावा केल्या. लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा एकेक मोठे फटके खेळत बाद झाला. तर नंतर टीम डेव्हिडने ८ चेंडूत ४ षटकार आणि एका चौकारासह २२ धावा केल्या. डेव्हिडने अखेरच्या षटकात सलग तीन षटकार लगावत संघाची धावसंख्या १९६ धावांवर नेऊन ठेवली.