Controversy between LSG and RCB match: आयपीएल २०२३ मधील ४३वा सामना वादग्रस्त ठरला. हा सामना एलएसजी आणि आरसीबी संघात लखनऊ येथे खेळला गेला. या सामन्याच्या शेवटच्या क्षणी विराट कोहली एलएसजीचा क्रिकेटर नवीन-उल-हकशी भिडला. त्यानंतर तो अमित मिश्रा आणि काइल मेयर्ससोबत भांडतानाही दिसला. तसेच सामना संपल्यानंतर तो पुन्हा एकदा एलएसजीचा मार्गदर्शक गौतम गंभीरसोबत भिडला. सध्या या वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. यासोबतच बहुतेक क्रिकेट चाहते विराट कोहलीच्या या वृत्तीला चुकीचे ठरवत आहेत.

भारताच्या वरिष्ठ खेळाडूंबाबत विराटच्या वृत्तीवर क्रिकेट चाहते टीका करत आहेत. चाहत्यांचे म्हणणे आहे की, अमित मिश्रा आणि गौतम गंभीर हे विराट कोहलीच्या तुलनेत खूप सीनियर खेळाडू आहेत. त्यामुळे प्रत्येक ज्युनियरने आपल्या सीनियरचा आदर केला पाहिजे. विशेष म्हणजे विराट कोहली याआधीही वरिष्ठ खेळाडूंशी पंगा घेत दिसला आहे.

Eknath Shinde On Heena Gavit :
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा हिना गावितांना अप्रत्यक्ष इशारा; म्हणाले, “बंडखोरी…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
IND vs AUS Paine criticism of Gautam Gambhir ahead Border Gavaskar Trophy
IND vs AUS : ‘… तो भारतीय क्रिकेट संघासाठी योग्य नाही’, रिकी पॉन्टिंगनंतर टिम पेनने गौतम गंभीरवर साधला निशाणा
KL Rahul Statement on Sanjiv Goenka Animated Chat in IPL 2024 loss Said Wasn’t the nicest thing Ahead
KL Rahul: “मैदानावर जे काही घडलं ते फार चांगलं…”, संजीव गोयंका भर मैदानात भडकल्याच्या घटनेवर केएल राहुलने पहिल्यांदाच केलं वक्तव्य
Ricky Ponting Hits Back at Gautam Gambhir over Virat Kohli Form Remarks Said He is quite a prickly character
Ricky Ponting on Gautam Gambhir: “स्वभावच इतका चिडचिडा…”, गौतम गंभीरबाबत रिकी पॉन्टिंगचे मोठे वक्तव्य, विराट कोहलीच्या फॉर्मवरून रंगला वाद
Afghanistan Batter Rahmanullah Gurbaj Surpasses Virat Kohli in Youngest to 8 Hundreds in Mens ODI Equals Sachin Tendulkar Record
AFG vs BAN: अफगाणिस्तानच्या फलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी, विराट कोहलीला मागे टाकलं तर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची केली बरोबरी
Gautam Gambhir Backs KL Rahul With Big Statement Said How Many Teams Have a Player Like Him Border Gavaskar Trophy
Gautam Gambhir on KL Rahul: “केएल राहुलसारखे खेळाडू किती देशात आहेत?”, गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?

विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार असताना, अनिल कुंबळे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. कोहलीला कुंबळेची कार्यशैली आवडत नसल्याच्या अनेक बातम्या मीडिया रिपोर्ट्समध्ये येत होत्या. अखेर कुंबळेला प्रशिक्षकपद सोडावे लागले.

त्याचप्रमाणे गेल्या वर्षी विराट कोहलीची बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशीही भांडण झाले होते. यानंतर या आयपीएलमध्येही विराट कोहली सौरव गांगुलीला रागाने पाहताना दिसला होता. याआधीही तो गौतम गंभीरसोबत भिडला आहे. आयपीएल २०१३ दरम्यान त्यांच्यात वाद झाला होता.

सामन्याबद्दल बोलायचे तर, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने २० षटकांत ९ गडी गमावून १२६ धावा केल्या. कर्णधार फाफ डुप्लेसिसने सर्वाधिक ४४ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊचा संघ १९.५ षटकांत १०८ धावांवर गारद झाला. लखनऊकडून कृष्णप्पा गौतमने १३ चेंडूत सर्वाधिक २३ धावा केल्या.

या पराभवासह लखनऊचा संघ दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्याचे नऊ सामन्यांतून पाच विजय आणि चार पराभवांसह १० गुण आहेत. त्याचवेळी बंगळुरूचेही नऊ सामन्यांत पाच विजय आणि चार पराभवांसह १० गुण आहेत. बंगळुरूचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.