Virat Kohli Six Video Viral : आयपीएल २०२३ च्या पाचव्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा आरसीबीने ८ विकेट्स राखून पराभव केला. आरसीबीचा हुकमी एक्का विराट कोहलीने ४९ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकार ठोकत नाबाद ८२ धावांची खेळी साकारली. विराटच्या अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीने मैदानात विजयाचा गुलाल उधळला. तत्पूर्वी सामन्यात एक रोमांच पाहायला मिळाला. आरसीबीला ६ धावांची गरज असताना विराटने गगनचुंबी षटकार ठोकला आणि सामना खिशात घातला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विश्वचषक २०११ च्या अंतिम सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने षटकार ठोकून भारताला विश्वचषक जिंकून दिलं होतं. या सामन्यातही विराटने षटकार मारून विजयाला गवसणी घातली, त्यामुळे तमाम क्रिकेटप्रेमींना विश्वचषकाची आठवण आली. विराटचा हा षटकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकरी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत.

नक्की वाचा – IPL 2023, Virat Kohli: चिन्नास्वामी मैदानात रचला इतिहास; कोहलीच्या नावावर ‘या’ विराट विक्रमाची नोंद

इथे पाहा व्हिडीओ

सामना संपल्यानंतर विराट कोहली काय म्हणाला?

“हा अभूतपूर्व विजय आहे. आम्ही खूप वर्षानंतर घरेलू मैदानावर खेळलो. आम्ही ज्या प्रकारे प्रदर्शन केलं, ते पाहून मला आनंद झाला. मुंबई इंडियन्सने पाच आणि चेन्नईने चारवेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. आम्ही सर्वात जास्त वेळा प्ले ऑफ मध्ये प्रवेश केलाय. यावरून लक्षात येतं की, आमच्या प्रदर्शनात सातत्य आहे. आम्हाला योग्य दृष्टीकोन ठेवून एका मजबूत टीमसोबत मैदानात उतरावं लागेल. यापुढेही आम्हाला अशा शैलीत खेळावं लागेल. आम्हाला आमच्या रणनितीचा योग्य वापर करावा लागेल.”