Virat Kohli Sets New Record : इंडियन प्रीमियर लीगचा पाचवा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात झाला. मुंबईन दिलेल्या १७२ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसने मुंबईच्या गोलंदाजांचा अक्षरक्षा धुव्वा उडवला. कोहलीने ४९ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकार ठोकत नाबाद ८२ धावांची वादळी अर्धशतकी खेळी केली. तर फाफने ६ षटकार आणि ५ चौकार मारत ७३ धावांची अर्धशतकी खेळी साकारली. कोहलीच्या धमाक्यामुळं आरसीबीने १६.२ षटकात २ विकेट्स गमावत सामना खिशात घातला. परंतु, कोहलीच्या या नाबाद खेळीसोबतच त्याच्यानावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झालीय. हा विक्रम मोडण्यासाठी दिग्गज फलंदाजांना घाम फुटेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आयपीएलमध्ये सर्वात जास्त अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम डेविड वॉर्नरच्या नावावर आहे. पण कोहलीने या इनिंगसोबत अर्धशतकांचा अर्धशतक ठोकलं आहे. हा कोलहीचा लीगच्या इतिहासातील पन्नासवा अर्धशतक झाला आहे. याचसोबत आता कोहलीची स्पर्धा तीन दिग्गज खेळाडूंसोबत आहे. या लिस्टमध्ये अव्वल स्थानावर डेविड वॉर्नर आहे. विराट पाठोपाठ शिखर धवनच्या नावावर ४९ अर्धशतक आहेत.

नक्की वाचा – RCB vs MI, IPL 2023: कोहलीचा धमाका! षटकार ठोकून RCB ला दिली विजयी सलामी; मुंबईवर ‘विराट’ विजय

तसंच रोहित शर्माने ४१ अर्धशतक ठोकण्याची कामगिरी केली आहे. आयपीएलमधून निवृत्त झालेल्या एबी डिविलियर्सने ४३ अर्धशतक ठोकले आहेत. यंदाच्या आयपीएल हंगामाला सुरुवात झाल्याने या खेळाडूंमध्ये अर्धशतक ठोकण्याची रस्सीखेच होणार आहे. करिअरच्या शेवटच्या सामन्यापर्यंत कोणता खेळाडू कितव्या नंबरवर राहतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तिलक वर्माच्या वादळी अर्धशतकामुळं मुंबई इंडियन्सने २० षटकांत ७ विकेट्स गमावत १७१ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर आरसीबीचे सलामीवीर फलंदाज विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसने अर्धशतकांच्या जोरावर आरसीबीला विजयी सलामी दिली. आरसीबीने १६. २ षटकात २ विकेट्स गमावत १७२ धावा केल्या. त्यामुळे मुंबईचा पराभव झाला.