Virat Kohli’s chance to complete 7000 runs in IPL: इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये शनिवारी संध्याकाळी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी साडेसातला अरुण जेटली स्टेडियम दिल्ली येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात विराट कोहलीला इतिहास रचण्याची एक सुवर्णसंधी असणार आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात विराट १२ धावा करताच विराट आयपीएलमध्ये ७००० धावांचा टप्पा पूर्ण करणारा आहे. ही कामगिरी विराट पहिलाच खेळाडू बनेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१२ धावा करताच कोहली इतिहास रचणार –

दिल्लीविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने १२ धावा केल्या, तर तो एक खास विक्रम आपल्या नावावर करेल. इंडियन प्रीमियर लीगमध्ये ७००० धावा पूर्ण करण्यासाठी त्याला १२ धावांची गरज आहे. विराटने या लीगमध्ये आतापर्यंत ६९८८ धावा केल्या आहेत. आरसीबीचा माजी कर्णधार विराटने १२ धावा केल्या तर तो ७ हजार धावा पूर्ण करणारा आयपीएल इतिहासातील पहिला फलंदाज ठरेल. विराटनेही आयपीएलमध्ये आतापर्यंत ५ शतके आणि ४९ अर्धशतके झळकावली आहेत.

विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे –

इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. लीगच्या १६व्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-५ फलंदाजांमध्ये त्याचा समावेश आहे. किंग कोहलीने आयपीएल २०२३ मधील ९ सामन्यांत ३६४ धावा केल्या आहेत. दरम्यान, नाबाद ८२ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. आयपीएलच्या या मोसमात विराटने ५ अर्धशतके झळकावली आहेत. यादरम्यान त्याने ३३ चौकार आणि ११ षटकार मारले आहेत.

हेही वाचा – ICC ODI Rankings: वनडे क्रमवारीत मोठा बदल; ऑस्ट्रेलियाला मागे टाकत पाकिस्तानने पहिल्यांदाच पटकावले अव्वल स्थान

दिल्ली आणि बंगळुरुची आकडेवारी –

याआधी दोन्ही संघ २९ वेळा आमनेसामने आले आहेत. यातील १८ सामने बंगळुरूने तर १० सामने दिल्लीने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघ नऊ वेळा आमनेसामने आले आहेत. यातील सहा सामने बेंगळुरूने तर तीन सामने दिल्लीने जिंकले आहेत.

आयपीएल २०२३ मध्ये आरसीबीची कामगिरी –

बंगळुरू संघ ९ सामन्यांत ५ विजय आणि ४ पराभवानंतर १० गुणांसह गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. आज जिंकल्यास, संघ १२ गुणांसह गुजरात टायटन्सनंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचेल. या संघाने गेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा १८ धावांनी पराभव केला होता.