Virat-Anushka and RCB Team Dinner Party: ९ मे रोजी भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासोबत डिनरसाठी गेले होते. जेवण करून ही जोडी रेस्टॉरंटमधून बाहेर पडताच, तेथे अनेक फोटोग्राफर्स उभे होते. त्यापैकी एका फोटोग्राफरने एकाने चुकून अनुष्काला ‘सर’ म्हटले, तेव्हा यावर विराटने मजा घेतली.
मात्र, नंतर तो गंमतीने म्हणाला की, मला विराट मॅमही म्हणं. यानंतर दोघेही या प्रकरणावर खूप हसताना दिसले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. खरं तर, या दोघांचा एकत्र फोटो क्लिक करण्यासाठी सर्व फोटोग्राफर्स रेस्टॉरंटच्या बाहेर आतुरतेने वाट पाहत होते.
वास्तविक, फोटोग्राफर्स विराट आणि अनुष्काचे फोटो काढत होते. यादरम्यान एका फोटोग्राफर्सने अनुष्का शर्माला चुकून सर म्हटले. मात्र, त्यानंतर त्यांनी माफीही मागितली. यावर विराट म्हणाला, आता विराट मॅमही म्हणं. त्यानंतर दोघेही हसायला लागले. यावेळी विराटने काळी पँट आणि पांढऱ्या स्नीकर्ससह प्रिंटेड शर्ट घातला होता, तर अनुष्काने पांढरी पँट आणि काळ्या हिल्ससह पांढरी स्ट्रीप पॅन्ट घातली होती.
आयपीएल २०२३ मधील आरसीबीची कामगिरी –
इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कामगिरी बरी राहिली आहे. या मोसमात त्यानी ११ सामने खेळले असून ५ जिंकले आहेत, तर ६ सामन्यात संघाचा पराभव झाला आहे. आरसीबी सध्या आयपीएल २०२३ च्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. त्यांना या मोसमातील प्लेऑफसाठी पात्र ठरायचे असेल, तर संघाला त्यांचे उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील.
हेही वाचा – CSK vs DC: धोनीने षटकारांची बरसात करताच झिवा आणि साक्षीच्या आनंदाला उरला नाही पारावार, पाहा VIDEO
विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने या मोसमात आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. विराट कोहलीने या मोसमात ११ सामन्यात ४२ च्या सरासरीने ४२० धावा केल्या आहेत. विराट व्यतिरिक्त फक्त फाफ डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी फलंदाजीत आरसीबीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आता उर्वरित तीन सामन्यांमध्ये संघाच्या उर्वरित खेळाडूंनाही जबरदस्त फलंदाजी करावी लागणार आहे.