Virat Kohli praised Shubman Gill after his century: आयपीएल २०२३ मध्ये गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुबमन गिलने सोमवारी शतक झळकावले. त्याचे आयपीएल कारकिर्दीतील हे पहिले शतक होते. शुबमनने अहमदाबादमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ५८ चेंडूत १३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १०१ धावा केल्या. या खेळीबद्दल त्याचे आजी-माजी क्रिकेटर्स कौतुक करत आहेत. अशात भारतीय संघाचा स्टार फलंदाजी विराट कोहलीनेही शुबमनचे कौतुक केले आहे. त्याने इन्स्टाग्राम शुबमन गिलची स्टोरी शेअर कौतुके केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराट कोहलीची इन्स्टाग्राम स्टोरी –

या आयपीएल हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या कोहलीने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका संदेशात शुबमनचे कौतुक केले आहे. कोहलीने लिहिले, “एका बाजूला क्षमता आहे आणि दुसऱ्या बाजूला गिल आहे. पुढे जा आणि पुढच्या पिढीचे नेतृत्व करा. देव तुला आशीर्वाद देईल.” या पोस्टद्वारे कोहलीने शुबमनला पुढच्या पिढीसाठी नेतृत्व करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे, कारण त्याने स्वत: भारतीय संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी ते काम अनेक वर्षे केले आहे.

या मोसमात शुबमन गिल उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे –

शुबमन यंदाच्या आयपीएलमध्ये शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत १३ सामन्यात ४८ च्या सरासरीने आणि १४६.१९ च्या स्ट्राईक रेटने ५७६ धावा केल्या आहेत. यादरम्यान शुबमनने एक शतक आणि चार अर्धशतकं झळकावली आहेत. त्याच्या एकूण आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने ८७ सामन्यांमध्ये ३४.८७ च्या सरासरीने आणि १२९.५७ च्या स्ट्राइक रेटने २४७६ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – MI vs LSG: क्विंटन डी कॉकने रचला इतिहास, एबी डिव्हिलियर्सचा ‘हा’ विक्रम मोडत केला मोठा कारनामा

शुबमन गिलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द –

शुबमनने भारताकडून १५ कसोटी, २४ एकदिवसीय आणि सहा टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ३४.२३ च्या सरासरीने ८९० धावा, एकदिवसीय सामन्यात ६५.५५ च्या सरासरीने १३११ धावा आणि टी-२० मध्ये ४०.४ च्या सरासरीने २०२ धावा केल्या आहेत. तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याची शतकं झळकावली आहेत. शुभमनने वनडेत द्विशतकही झळकावले आहे.

हेही वाचा – LSG vs RCB: विराट कोहली आणि नवीन उल हक पुन्हा एकदा येणार आमनेसामने! कसे असेल प्लेऑफचे समीकरण? जाणून घ्या

गुजरातने हैदराबादचा ३४ धावांनी पराभव केला –

आयपीएल २०२३ मध्ये, सोमवारी गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा ३४ धावांनी पराभव केला. या विजयासह गुजरात प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. १३ सामन्यांनंतर गुजरातचे १८ गुण आहेत. हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. या पराभवासह हैदराबादसाठी प्ले ऑफचे दरवाजे बंद झाले आहेत. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने नऊ गड्यांच्या मोबदल्यात १८८ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ नऊ गडी गमावून केवळ १५४ धावा करू शकला आणि सामना गमावला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli praised shubman gill after his century against srh on instagram story vbm