Virat Kohli explains why close matches are happening this season: एम चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक चकमकीत आरसीबीने आरआरचा ७ धावांनी पराभव केला. शेवटच्या षटकात राजस्थानला विजयासाठी २० धावांची गरज होती, मात्र राजस्थानला केवळ १२ धावा करता आल्या. बंगळुरुचा या मोसमातील हा चौथा विजय असून तो आता ८ गुणांसह पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. विजयानंतर विराट कोहलीने या हंगामात सामने का अटीतटीचे होत आहेत, याबाबत खुलासा केला.
प्रभावशाली खेळाडूंच्या (इम्पॅक्ट प्लेयर) नियमावर विराट कोहली काय म्हणाला?
विजयानंतर कर्णधार विराट कोहलीने ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराजचे कौतुक केले. तो मॅक्सवेलबद्दल म्हणाला की, तो असा खेळाडू आहे, जो केवळ ४ षटकांत प्रतिस्पर्धी संघापासून सामना दूर घेऊन जातो. प्रभावशाली खेळाडूंच्या नियमाबाबत, कोहली म्हणाला की, ”या नियमामुळे खेळ खूप खुलला आहे. त्यामुळेच या मोसमात आपल्यावा खूपच अटीतटीचे सामने पाहायला मिळत आहेत.”
विराटने फाफ डुप्लेसी आणि मॅक्सवेल यांच्या काउंटर अॅटॅकचे कौतुक केले. तो म्हणाला, “चेन्नईविरुद्धच्या सामन्यापेक्षा चांगला होते. या विकेटवर १६० धावा पुरेशा ठरल्या असत्या, पण या दोघांच्या फलंदाजीमुळे आम्ही ९० धावांपर्यंत मजल मारू शकलो.”
मोहम्मद सिराजबद्दल बोलताना कोहली काय म्हणाला?
मोहम्मद सिराजचे कौतुक करताना विराट कोहली म्हणाला की, “त्याने शानदार गोलंदाजी केली. त्याने बटलरला ज्या पद्धतीने बाद केले, ते कौतुकास्पद होते. आता तो पर्पल कॅपधारक आहे आणि त्याने असे का आहे ते सांगितले? चिन्नास्वामीमध्ये अशा प्रकारे गोलंदाजी करणे सोपे नाही, परंतु त्याने ते करुन दाखवले.”
हेही वाचा – Sachin Tendulkar @50: सचिन ‘या’ गोलंदाजाचा सामना करताना घाबरायचा; स्वतःच केला खुलासा, जाणून घ्या कोण आहे?
विराट कोहलीने जोश हेझलवूडबद्दल अपडेट दिली. तो म्हणाला की, “पुढील सामन्यापासून तो संघासाठी उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. आरसीबीचा पुढील सामना ३ दिवसांनी म्हणजेच २६ एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध त्याच मैदानावर होणार आहे. जोश हेझलवूडच्या आगमनाने आरसीबीची गोलंदाजी आणखी मजबूत होईल.”