Virat Kohli praises Yashasvi Jaiswal: आयपीएल २०२३ मधील ५६ वा सामना राजस्थाान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. या सामन्यात राजस्थाानने कोलकाताचा ९ गडी राखून पराभव केला. या सामन्यात सलामीवीर यशस्वी जैस्वालने शानदार खेळी केली. जैस्वालने ४७ चेंडू, १३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ९८ धावा केल्या. या खेळीनंतर विराट कोहलीने यशस्वीचे कौतुक करताना आपली इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे.

यशस्वी जैस्वालची खेळी पाहून विराट कोहलीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये कोहलीने लिहिले, “मी काही काळामध्ये पाहिलेली ही सर्वोत्तम फलंदाजी आहे. किती प्रतिभा आहे.” पुढे त्यांनी यशस्वीला त्याच्या स्टोरीत टॅगही केले. यशस्वीच्या या खेळीमुळे राजस्थानने हा सामना अगदी सहज जिंकला.

Virat Kohli comes now it seems like he can be dismissed without any issues says Aakash Chopra
Virat Kohli : ‘आता असं वाटतं की विराटला कोणत्याही अडचणीशिवाय…’, भारताच्या रनमशीनबद्दल आकाश चोप्राचे मोठे वक्तव्य
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Rohit Sharma Statement Rishabh Pant Controversial Wicket in IND vs NZ Mumbai test said The bat was close to the pads
IND vs NZ: “सर्वांसाठी सारखेच नियम ठेवा…”, ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर रोहित शर्मा भडकला, खरंच पंत नॉट आऊट होता?
Shubman Gill Overtakes Cheteshwar Pujara
Shubman Gill : शुबमन गिलने चेतेश्वर पुजाराला मागे टाकत केली खास कामगिरी, रोहित शर्माच्या स्पेशल क्लबमध्ये झाला सामील
Rishabh Pant attained a stellar milestone and surpassed his idol, MS Dhoni
Rishabh Pant : ऋषभ पंतने अवघ्या ३६ चेंडूत अर्धशतक झळकावत केला खास पराक्रम, महेंद्रसिंग धोनीलाही टाकले मागे
Shreyas Iyer not retained for IPL 2025 by KKR
Shreyas Iyer : ‘श्रेयस अय्यर KKR च्या रिटेन्शन लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर होता, पण…’, केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर यांचा मोठा खुलासा
Rishabh Pant Shubman Gill Hits Fiery Fifty against New Zealand as India Got Good Start IND vs NZ 3rd Test Day 2
IND vs NZ: भारतीय संघाची टी-२० स्टाईल सुरूवात, पंत-गिलची झंझावाती अर्धशतकं; किवी गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Virat Kohli Broke Sachin Tendulkar World Record of Most Runs After First 600 Innings in International Cricket
Virat Kohli: ४ धावांवर धावबाद झाल्यानंतरही विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक –

केकेआरविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात यशस्वीने आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा पराक्रमही केला. जैस्वालने केवळ १३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या प्रकरणात त्याने भारतीय फलंदाज केएल राहुल आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅट कमिन्सचा विक्रम मोडला. केकेआरकडून खेळताना पॅट कमिन्सने आणि पंजाब किंग्जसाठी खेळताना केएल राहुलने हा पराक्रम केला होता. आयपीएलमध्ये १४ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा विक्रम या दोन्ही खेळाडूंच्या नावावर होता. मात्र, आता हा विक्रम राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जैस्वालच्या नावावर झाला आहे.

हेही वाचा – KKR vs RR Match Updates: IPLचा नंबर १ गोलंदाज! भल्याभल्यांना मागे टाकत युजवेंद्र चहल बनला विक्रमांचा बेताज बादशाह

राजस्थानने अवघ्या १३.१ षटकांत सामना जिंकला –

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटकात ८ गडी गमावून १४९ धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने केवळ १ विकेटच्या मोबदल्यात १३.१ षटकात लक्ष्य गाठले. यशस्वी जैस्वालशिवाय कर्णधार संजू सॅमसनने २९ चेंडूंत २ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या. त्याचबरोबर युजवेंद्र चहलने ४ विकेट्स घेतल्या. तसेच तो आयपीएलमधील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.