Virat Kohli Says MS Dhoni’s Teachings: विराट कोहली सध्या आयपीएल २०२३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळत आहे. या मोसमातील काही सामन्यांमध्ये त्याने फाफ डू प्लेसिसच्या अनुपस्थितीत आरसीबीची जबाबदारीही घेतली होती. दरम्यान, आता विराट कोहलीच्या मुलाखतीची एक क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो म्हणत आहे की, त्याला महेंद्रसिंग धोनीकडून एक गोष्ट शिकायला मिळाली आहे की तुम्ही सर्वांना खूश करू शकत नाही.

विराट कोहलीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो अनेक गोष्टींबद्दल बोलत आहे. त्याच व्हिडिओमध्ये, तो म्हणाला, “एक गोष्ट मी एमएस धोनी आणि इतर लोकांकडून शिकलो आहे, ज्यांनी कर्णधारपद भूषवले आहे. तुम्ही प्रत्येक वेळी सर्वांना संतुष्ट करू शकत नाही.”

Virat Kohli comes now it seems like he can be dismissed without any issues says Aakash Chopra
Virat Kohli : ‘आता असं वाटतं की विराटला कोणत्याही अडचणीशिवाय…’, भारताच्या रनमशीनबद्दल आकाश चोप्राचे मोठे वक्तव्य
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
Kolkata’s chess star Anish Sarkar impresses Anand Mahindra
कोण आहे अनिश सरकार? तीन वर्षाच्या चिमुकल्याने जिंकले आनंद महिंद्रा यांचे मन, Video शेअर करत केले त्याचे तोंडभरून कौतुक
Mrunal Thakur Comment on Diwali Edited Video
Mrunal Thakur Comment: “त्याचे प्रत्येक अभिनेत्रीबरोबर व्हिडीओ, माझं तर मन…”, चाहत्याचे एडिटेड व्हिडीओ पाहून मृणाल ठाकूरची खोचक टिप्पणी
suraj chavan new reel comments
सूरज चव्हाणचे ट्रेडिंग गाण्यावर रील पाहून युजर म्हणाला, “भाऊ, तू असे व्हिडीओ नको बनवत जाऊस…”
Virat Kohli on IPL 2025 Retention RCB players List
Virat Kohli : ‘मला या संघाबरोबर २० वर्ष…’, RCB ने रिटेन केल्यानंतर विराटने व्यक्त केल्या भावना; म्हणाला, ‘मी इतकी वर्षे…’
Video : konkani young guy dance so gracefully
“आपली संस्कृती दाखवायला लाजायचं नाही!” कोकणी तरुणाने केला भन्नाट डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच

धोनीच्या नेतृत्वाखाली कोहलीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात –

विराट कोहलीने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तेव्हा महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता. यानंतर धोनीने २०१४ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि विराट कोहलीची भारतीय कसोटी संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर २०१७ मध्ये विराट कोहली टी-२० आणि वनडे फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार बनला.

हेही वाचा – RR vs KKR: यशस्वी जैस्वालची वादळी खेळी पाहून विराट कोहलीही झाला आश्चर्यचकित; म्हणाला, “मी पाहिलेली ही सर्वोत्तम…”

सध्या रोहित शर्मा तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर विराट कोहलीने शेवटची टीम इंडियाची कमान हाती घेतली होती. सध्या विराट कोहलीच्या नावावर सर्वात यशस्वी भारतीय कसोटी कर्णधार, असा टॅग आहे. त्याने एकूण ६८ कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे, ज्यामध्ये टीम इंडियाने ४० जिंकले आहेत.

किंग कोहलीची आतापर्यंतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द –

विराट कोहलीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत एकूण १०८ कसोटी, २७४ एकदिवसीय सामने आणि ११५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ८४१६ धावा, एकदिवसीय सामन्यात १२८९८ धावा आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ४००८ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – KKR Team: राजस्थानविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर कोलकाता आयपीएल २०२३ च्या प्लेऑफमध्ये कसा पोहोचू शकतो? जाणून घ्या

विराट कोहलीची आयपीएल २०२३ मधील कामगिरी –

विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने या मोसमात आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. विराट कोहलीने या मोसमात ११ सामन्यात ४२ च्या सरासरीने ४२० धावा केल्या आहेत. विराट व्यतिरिक्त फक्त फाफ डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी फलंदाजीत आरसीबीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आता उर्वरित तीन सामन्यांमध्ये संघाच्या उर्वरित खेळाडूंनाही जबरदस्त फलंदाजी करावी लागणार आहे.