Virat Kohli Reveals About His Captaincy: एमएस धोनी कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर विराट कोहलीने भारतीय संघाची सूत्रे हाती घेतली. कोहलीच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात भारताला कोणतीही मोठी आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात यश आले नसले तरी, संघाने जागतिक क्रिकेटवर वर्चस्व कायम ठेवले. आपल्या सहकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यापासून ते आपल्या खेळाडूंसाठी उभे राहण्यापर्यंत, कोहलीने कर्णधारपदाची भूमिका सुंदरपणे हाताळली आहे.
मात्र, वरिष्ठ संघात येण्यापूर्वी कोहलीने ज्युनियर स्तरावर कर्णधार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली होती. अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारताला विजय मिळवून देण्यापूर्वी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीचे नेतृत्व केले. एका मुलाखतीत कोहलीने सांगितले, कर्णधार म्हणून अनेक चुका केल्या आहेत, आणि ते मान्य करायला लाज वाटत नाही, असा खुलासा त्याने केला आहे. आपण जे काही केले ते संघाच्या भल्यासाठीच केले, असे तो म्हणाला.
विराट कोहली म्हणाला, “कर्णधार असताना मी अनेक चुका केल्या, हे मान्य करायला मला लाज वाटत नाही, पण एक गोष्ट मला पक्की माहीत आहे की मी माझ्या स्वार्थासाठी कधीच काही केले नाही. संघाला पुढे नेणे हेच माझे ध्येय होते, अपयश येत राहिले, पण हेतू कधीच चुकीचा नव्हता.”
‘लेट देअर बी स्पोर्ट’च्या एका एपिसोडमध्ये कोहलीने या गोष्टी सांगितल्या. चाहते ते डिज्नी + हॉटस्टारवर पाहू शकतात. कोहली भारतीय संघाचा एक भाग आहे, पण त्याने संघाची कमान सोडली आहे. रोहित शर्मा सध्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. कोहली सध्या इंडियन प्रीमियर लीगच्या चालू हंगामाचा भाग आहे. तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत आहे.
हेही वाचा – VIDEO: ऋषभ पंतच्या चाहत्याने व्हायरल केलेल्या व्हिडीओवर उर्वशी रौतेला संतापली; म्हणाली, “माझे आडनाव…”
विराटने आयपीएल २०२१नंतर आरसीबीचे कर्णधारपदही सोडले होते. मात्र, या मोसमात त्याने फॅफ डुप्लेसिसच्या अनुपस्थितीत काही सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. चालू हंगामात कोहलीने ११ सामन्यांत ४२.०० च्या सरासरीने ४२० धावा केल्या आहेत. आयपीएल २०२३ मध्ये त्याचा स्ट्राइक रेट आतापर्यंत १३३.७६ आहे.