Virat Kohli searching MS Dhoni in the dressing room : एमएस धोनी आयपीएलचा पुढचा सीझन खेळणार की नाही हे कोणालाच माहीत नाही. पण चाहत्यांपासून ते क्रिकेट तज्ज्ञांपर्यंत ते मानतात की आयपीएल २०२४ त्यांच्यासाठी शेवटचा होता. असे झाल्यास रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना हा त्यांचा शेवटचा सामना ठरेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना यापुढे धोनी आणि कोहली यांच्यातील मैत्री मैदानावर दिसणार नाही, ज्याची त्यांना खूप आठवण येईल. पण त्याहीपेक्षा विराट स्वत: त्याच्या खास मित्राला मिस करणार आहे आणि त्यालाही याची जाणीव आहे. त्यामुळे आरसीबीच्या विजयानंतर लगेचच त्याने मैदानावर आपल्या ‘माही भाई’चा शोध सुरू केला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पराभवानंतर धोनीने राखले अंतर –

सीएसके संघाप्रमाणे एमएस धोनीलाही आयपीएलमधून निवृत्त होण्यापूर्वी स्वत:ला विजयाची भेट द्यायची होती. पण त्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. १८ मे ही तारीख पुन्हा आरसीबी संघासाठी लकी ठरली, ज्यामुळे सीएसकेला पराभूत होऊन आयपीएल २०२४ मधून बाहेर पडावे लागले. या पराभवाने धोनी खूपच नाराज दिसला. मैदानावर सहसा आपल्या भावना न व्यक्त करणारा ‘कॅप्टन कूल’ सामन्यानंतर रागावलेला दिसला आणि त्याने स्वतःला सर्वांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याने सामना संपल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील खेळाडूंशी हस्तांदोलन करणे सुद्धा टाळले ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सामना संपताच एमएस धोनी ड्रेसिंग रूममध्ये गेला. दुसरीकडे, मोठ्या कष्टाने आपल्या संघाला प्लेऑफमध्ये नेणारा विराट कोहली आनंदी होताच, पण त्याला आपल्या ‘माही भाई’सोबत क्रिकेट खेळता येणार नाही याचेही दुःख होते. त्यामुळे एकीकडे संपूर्ण संघ विजयाचा आनंद साजरा करत होता, तर दुसरीकडे तो धोनीचा शोध घेत होता. धोनी ड्रेसिंग रूममध्ये असल्याचे समजताच विराट लगेच त्याला भेटण्यासाठी त्याच्या मागे गेला. पण धोनीच्या विकेटवर सेलिब्रेशन आणि हस्तांदोलन न करण्यावरून वाद निर्माण झाला आहे.

हेही वाचा – IPL 2024 : नऊ वर्षानंतर राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी Eliminator मध्ये आमनेसामने, पाहा आकडेवारी

काय आहे संपूर्ण वाद?

मात्र, धोनी आणि विराटमध्ये चांगली मैत्री आहे आणि दोघेही एकमेकांचा खूप आदर करतात. पण दोघांमध्ये चाहत्यांचे युद्ध सुरू झाले आहे. क्रिकबझवर आरसीबी आणि सीएसके यांच्यातील सामन्याचे विश्लेषण करताना, प्रसिद्ध क्रिकेटपटू हर्षा भोगले आणि मायकल वॉन म्हणाले, “आरसीबीच्या खेळाडूंनी एमएस धोनीला बाद केल्यानंतर त्याच्याशी हस्तांदोलन करायला हवे होते, कारण हा कदाचित त्याचा शेवटचा सामना होता.”

हेही वाचा – IPL 2024 : एमएस धोनी IPL मधून निवृत्ती घेणार की नाही? चेन्नई सुपर किंग्जच्या सीईओने केला मोठा खुलासा

ते असेही म्हणाले की, आरसीबीच्या खेळाडूंनी त्याची विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन करायला नको होते. कारण हा त्यांचा शेवटचा सामना असू शकतो. या वक्तव्यावर आरसीबीच्या चाहत्यांनाी संताप व्यक्त केला आहे. आरसीबीच्या चाहत्यांनी धोनीवर लज्जास्पद कृत्य केल्याचा आरोप केला. पराभवानंतर विराट कोहली स्वत: त्याला भेटायला गेला असतानाही तो हस्तांदोलनासाठी मैदानावर आला नाही.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli searching for him in the dressing room after ms dhoni avoided shaking hands with rcb players after defeat vbm