Virat Kohli Mothers Day Post: भारतासह अनेक देशांमध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा केला जातो. आज म्हणजेच १४ मे रोजी या वर्षीचा मदर्स डे साजरा केला जात आहे. या खास प्रसंगी, भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने त्याची आई आणि पत्नी अनुष्का शर्मा यांचा फोटो शेअर केला. कोहलीने त्याच्या अधिकृत ट्विटरवरून तीन फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये त्याने आईसोबत अनुष्का शर्माच्या आईचा फोटोही शेअर केला आहे. याशिवाय त्याने अनुष्का आणि त्याची मुलगी वामिकासोबत एक खास फोटोही जोडला आहे. विराट कोहलीने त्याच्या आईसोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये, तो पिवळ्या कुर्त्यामध्ये दिसत आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर मोठे स्मितहास्य दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी ‘हॅपी मदर्स डे’च्या शुभेच्छा दिल्या. त्याच्या या सोशल मीडिया पोस्टमध्ये कोहलीने अनुष्का शर्माला टॅग केले आहे.
अनुष्का शर्मा २०२१ मध्ये आई झाली –
विराट कोहलीने २०१७ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न केले. दोघांनी इटलीत लग्न केले होते. यानंतर, २०२१ मध्ये दोघेही एका मुलीचे पालक झाले, जिचे नाव वामिका ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा – Mother’s Day 2023: सचिन तेंडुलकरने मदर्स डेनिमित्त शेअर केला आईचा खास फोटो; म्हणाला, ”एआयच्या युगात आई…”
राजस्थानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली स्वस्तात बाद –
आज आयपीएल २०२३ मधील ६० वा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात खेळला जात आहे. या सामन्यात विराट कोहली १९ चेंडूत १८ धावा करुन बाद झाला. आजचा हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. आतापर्यंत आरसीबीने ११ सामन्यांत ६ विजयांसह गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे.
या मोसमात कोहलीच्या कामगिरीबद्दल बोलायचे, तर तो आतापर्यंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला आहे. १२ सामन्यांत त्याने ४२ च्या सरासरीने आणि १३३.७६ च्या स्ट्राईक रेटने ४३८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एकूण ६ अर्धशतके झळकली आहेत.