Kevin Pietersen Tweet Viral On Social Media : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्लीने बाजी मारली. सामन्याआधी विराट कोहलीनं त्याच्या बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांचे पाय धरले. गुरुला पाहिल्यावर विराट भावूक झाला आणि त्यांचे पाय धरत आशिर्वाद घेतला. दिल्ली आणि बंगळुरुमध्ये अरुण जेटली स्टेडियममध्ये रंगतदार सामना झाला. या मैदानावर विराटने त्याच्या करिअरला सुरुवात केली. विराटने त्याचे प्रशिक्षक शर्मा यांना दिलेला सन्मान पाहिल्यानंतर इंग्लंडचा माजी क्रिकेटर केविन पीटरसनने एक ट्वीट करत दिल्ली कॅपिटल्सच्या टीम मॅनेजमेंटला आवाहन केलं आहे. विराट कोहलीनं घरवापसी करावी आणि घरेलु टीम दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळावं, अशाप्रकारची प्रतिक्रिया पीटरसनने दिली आहे.
पीटरसनने ट्वीट करत म्हटलं, “कोलहीनं त्याच्या बालपणीचे प्रशिक्षक यांची भेट घेतल्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर माझ्या मनात काही विचार आले. विराटला घरच्या मैदानात खेळूद्या. दिल्ली कॅपिटल्सने मोठी रक्कम देऊन विराटला पुढील हंगामात घरेलू मैदानावर घेऊन यावं. बॅकहम, रोनाल्डो, मेसी सर्वजण त्यांच्या करिअरमध्ये पुढे गेले आहेत. तुम्हाला काय वाटत..”
इथे पाहा ट्वीट
पीटरसनचं ट्वीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं असून चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. पीटरसनने या ट्वीटसोबत त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोल घेतला. ज्यामध्ये कोहलीनं घरवापसी करावी, असं मत ५७ टक्के लोकांनी व्यक्त केलं आहे. तर ४३ टक्के लोकांचं म्हणणं आहे की, कोहलीने आरसीबीसाठीच खेळावं.
आयपीएल २०२३ च्या ५० व्या सामन्यात कोहलीने दिल्ली कॅपिटल्सविरोधात ४६ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. या धावांच्या जोरावर कोहलीने आयपीएल करिअरमधील ५० वा शतक ठोकलं. तसंच कोहलीने आयपीएमध्ये ७००० धावा पूर्ण करण्याचा विक्रमही केला. कोहली आयपीएल इतिहासात ७ हजार धावा करणारा पहिला क्रिकेटर बनला आहे.