IPL 2025 Virat Kohli Shreyas Iyer Viral Video: आरसीबीने पंजाब किंग्सच्या त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव करत पराभवाचा बदला घेतला आहे. विराट कोहलीच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर आरसीबीने ४८ तासांच्या आत पंजाब किंग्जचा पराभव करून मागील पराभवाचा बदला घेतला. १८ एप्रिलला आरसीबीच्या घरच्या मैदानावर पंजाबने संघाचा पराभव केला होता. कोहलीने पंजाबविरुद्ध ७३ धावांची नाबाद खेळी केली आणि त्याचा संघ आरसीबी जिंकताच कोहलीने सेलिब्रेशन करत श्रेयस अय्यर चिडवलं. दरम्यान अय्यर आणि कोहलीमध्ये बाचाबाची झालेली पाहायला मिळाली.

प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सने १५७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, विराट कोहली सलामीवीर म्हणून आला आणि त्याने जबाबदारी घेतली आणि संघाला सामना जिंकून देत माघारी परतला. कोहलीने ५४ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह ७३ धावांची नाबाद खेळी केली. ज्यामुळे आरसीबीने सात विकेट्सने सहज विजय मिळवला.

विराट कोहली आणि देवदत्त पड्डिकल यांनी शतकी भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. देवदत्त पड्डिकल ३५ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह ६१ धावा करत बाद झाला. यानंतर रजत पाटीदार १२ धावा करत लवकर बाद झाला. नंतर १९व्या षटकात जितेश शर्माने विजयी षटकार लगावत संघाला विजय मिळवून दिला. विजयी षटकार पाहताच विराट कोहली श्रेयस अय्यरकडे पाहत त्याला चिडवताना दिसला.

विराट कोहली श्रेयसला चिडवत असताना श्रेयस षटकार पाहत होता, पण श्रेयसने विराटला पाहताच त्याच्याजवळ चालत गेला आणि दोघं काहीतरी बोलत हसताना दिसले. विराट त्याच्याशी बोलत असताना हसत तर होता, पण श्रेयस कुठेतरी पराभवानंतर शांत दिसला. यानंतरही विराट पुन्हा श्रेयसला चिडवण्यासाठी गेला तेव्हाही श्रेयसच्या चेहऱ्यावर फारसे मजेशीर भाव नव्हते.

आरसीबीच्या संघाने यंदाच्या मोसमात इतर संघाच्या घरच्या मैदानावरील एकही सामना गमावलेला नाही. तर आरसीबीने आपल्या घरच्या मैदानावरील तिन्ही सामने गमावले आहेत. पंजाब किंग्स संघावरील या विजयासह आरसीबीचा संघ आता १० गुणांसह तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.