Royal Challengers Bangalore vs Gujrat Titans Match Update : आयपीएल २०२३ चा ७० वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होत आहे. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या आरसीबीच्या फलंदाजांनी गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. विराट कोहली आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस या सलामी जोडीनं पॉवर प्ले मध्ये चौफेर फटकेबाजी केली. फाफ बाद झाल्यानंतर कोहलीनं पुन्हा एकदा ‘विराट’ खेळी करत यंदाच्या आयपीएलमध्ये सलग दुसरं शतक ठोकलं.

आयपीएलच्या इतिहासात सात शतक ठोकण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर झाला आहे. विराट कोहलीने ६१ चेंडूत १३ चौकार आणि १ षटकार ठोकून धावांचा पाऊस पाडत १०१ धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळं आरसीबीने २० षटकात ५ विकेट्स गमावत १९७ धावांपर्यंत मजल मारली. गुजरात टायटन्सला विजयासाठी १९८ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.

IND vs ENG Yuvraj Singh praises Abhishek Sharma innings against England at Wankhede stadium
IND vs ENG : ‘मला तुझ्याकडून हेच…’, अभिषेक शर्माच्या ऐतिहासिक शतकानंतर ‘गुरु’ युवराज सिंगने केले कौतुक
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Hardik Pandya Shivam Dube Partnership Record with Fifty for 6th Wicket IND vs ENG 4th T20I
IND vs ENG: हार्दिकचा नो-लूक षटकार तर शिवम दुबेचं दणक्यात पुनरागमन; दुबे-पंड्याने अर्धशतकांसह भारतासाठी रचली विक्रमी भागीदारी
We always learn from a T20I Game Says Suryakumar Yadav after defeat against England in 3rd T20I
IND vs ENG : ‘…म्हणून पराभव पदरी पडला’, सूर्यकुमार यादवने सांगितला राजकोट सामन्यातील टर्निंग पॉइंट
Hardik Pandya Throws Bat Curses Himself After His Wicket in IND vs ENG 3rd T20I Video Viral
IND vs ENG: हार्दिक पंड्याने आऊट झाल्यावर मैदानातच काढला राग, बॅट फेकली अन्… VIDEO व्हायरल
Virat Kohli net practice with Sanjay Bangar video viral ahead Ranji Trophy match
Virat Kohli Net Practice : विराट कोहलीने रणजी ट्रॉफीमध्ये परतण्यापूर्वी गाळला घाम, नेटमध्ये सराव करतानाचा VIDEO होतोय व्हायरल
Tilak Verma and Suryakumar Yadav victory celebration video goes viral after India won Chepauk
Tilak Verma : तिलकच्या वादळी खेळीने जिंकलं सूर्याचं मन, वाकून सलाम करतानाचा VIDEO होतोय व्हायरल
IND vs ENG Harry Brook Clean Bowled on Varun Chakravarthy in 2nd T20I Despite no Smog
IND vs ENG: “बघ धुकं आहे का?”, हॅरी ब्रुक वरूणच्या गोलंदाजीवर पुन्हा क्लीन बोल्ड, विकेट पाहून झाला चकित; VIDEO व्हायरल

आरसीबीसाठी कर्णधार फाफ डु प्लेसिसने १९ चेंडूत २८ धावा केल्या. नूर अहमदच्या फिरकीवर फाफ बाद झाला आणि आरसीबीला मोठा धक्का बसला. विराटने पुन्हा एकदा धडाकेबाज फलंदाजी केली अन् गुजरातविरोधातही शतकी खेळी करत इतिहास रचला. विराट ६१ चेंडूत १०१ धावा करून नाबाद राहिला. ग्लेन मॅक्सवेल ११ धावांवर असताना राशिद खानच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. माहिपाल लोमरोरलाही धावांचा सूर गवसला नाही. तो फक्त १ धाव करून नूर अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. पण ब्रेसवेलने गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेत २६ धावा केल्या. तो शमीच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर अनुज रावत १५ चेंडूत २३ धावा करत नाबाद राहिला.

Story img Loader