SRH vs RCB Virat Kohli Highlights: आयपीएल २०२३ मधील ६५ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघात खेळला गेला. विराट कोहलीने गुरुवारी रात्री सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध झळकावलेल्या आपल्या 6व्या शतकासह इंडियन प्रीमियर लीग (IPL) नवा रेकॉर्ड रचला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB) प्लेऑफच्या शर्यतीत कायम ठेवण्यासाठी १८७ धावांचे अवघड आव्हान पूर्ण करायचे होते. कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस यांच्यातील १७२ धावांच्या भागीदारीमुळे हे काम सोपे झाले व आरसीबीने 8 गडी राखून सामना जिंकला तसेच पॉइंट टेबलवर पुन्हा पहिल्या चारमध्ये झेप घेतली.
विराट कोहलीच्या उत्कृष्ट खेळीमध्ये चार षटकार आणि १२ चौकारांचा समावेश होता. १० व्या षटकाच्या शेवटी तो ३१ चेंडूत ४७ धावांवर होता, त्यानंतर त्याने असा काही वेग पडकला आणि हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाईच सुरु केली. अभिषेक शर्मा आणि मयंक डागर नंतर भुवनेश्वर कुमारचा करताना त्याने १५ व्या षटकात चार चौकार ठोकले.
२९ चेंडूत ५३ धावा करत, कोहलीने षटकारासह 6वे आयपीएल शतक झळकावले आणि स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक शतकांच्या ख्रिस गेलच्या विक्रमाची बरोबरी केली. यानंतर स्वतः मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कोहलीच्या कौतुकाची एक खास ट्वीट केले आहे.
सचिन म्हणतो की, “तो (विराट) जेव्हा कव्हर ड्राइव्ह खेळला तेव्हा पहिल्याच चेंडूपासून हा दिवस विराटचा असेल हे स्पष्ट झाले. विराट आणि फॅफ दोघेही संपूर्ण नियंत्रणात दिसत होते, त्यांनी अनेक मोठे शॉट्स खेळले पण त्याहीपेक्षा यशस्वी भागीदारी करण्यासाठी विकेट्सच्या दरम्यान ताळमेळ उत्तम राखला होता. दोघांनी ज्या प्रकारे फलंदाजी केली त्यासाठी १८६ ही मोठी धावसंख्या नव्हती.”
याशिवाय विराटच्या माजी सहकाऱ्यांनी म्हणजेच वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंह. इरफान पठाण, हरभजन सिंह, रॉबिन उथ्थप्पा, सुरेश रैना व अनेकांनी विराटच्या शतकाचे कौतुक करत ट्वीट केले आहे.
हे ही वाचा<< अमिताभ बच्चन यांनी सर्वात भारी क्रिकेटरचा ‘तो’ Video केला पोस्ट; लोकं म्हणतात, “हा पाकिस्तानी…”
तर कोहलीनेही शतकानंतर प्रतिक्रिया देत”मी कधीच भूतकाळातील आकड्यांकडे पाहत नाही. मी आधीच खूप तणावाखाली आहे. प्रभावी शॉट्स खेळूनही मी स्वतःला कधी-कधी पुरेसे श्रेय देत नाही. (म्हणून) बाहेरून कोणी काय म्हणेल याची मला पर्वा नाही. कारण ते त्यांचे मत आहे” असे म्हटले होते.