IPL 2025 CSK vs RCB Virat Kohli Khaleel Ahmed Viral Video: आयपीएल २०२५ ला आरसीबीने दणक्यात सुरूवात केली आहे. सुरूवातीचे दोन्ही सामने उत्कृष्ट सांघिक कामगिरीसह जिंकत गुणतालिकेत पहिले स्थान कायम राखले आहे. यासह आरसीबीने सीएसकेचा ५० धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. विराट कोहली या सामन्यात धावा करण्यासाठी संघर्ष करताना दिसला. त्याने काही चांगले फटके खेळले, पण मोठी धावसंख्या करू शकला नाही. दरम्यान सामन्याच्या सुरूवातीलाच खलील अहमदबरोबर त्याचं शीतयुद्ध सुरू होतं. सामन्यानंतर या दोघांचा बोलतानाचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये विराट कोहली खलील अहमद दिसताच त्याच्यावर वैतागलेला दिसत आहे. विराट व्हीडिओमध्ये आधी रवींद्र जडेजाबरोबर मजा मस्ती करत बोलताना दिसत आहे. विराटचं लक्ष दुसरीकडे जाताच तिथे त्याला खलील अहमद दिसतो. खलील दिसताच विराट चांगलाच वैतागतो. विराट रागात त्याला चांगलाच सुनावताना दिसत आहे. तर खलीलही यावर विराटला बोलताना दिसत आहे. पण नेमकं कशावरून हे प्रकरण सुरू आहे; जाणून घेऊया.
विराट-खलील अहमद यांच्यात लाईव्ह सामन्यात कशावरून झाला वाद?
रॉयल चॅलेंजर्सचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. चेन्नईकडून खलील अहमद नव्या चेंडूने चांगली कामगिरी करत होता आणि तो चांगल्या फॉर्मातही आहे. दरम्यान सलामीला उतरलेला विराट कोहली खलीलच्या गोलंदाजीवर संघर्ष करताना दिसला. विराट कोहली पहिल्याच चेंडूवर क्लोज कॉलपासून बचावले. खलीलने विराटला टाकलेला पहिलाच चेंडू पॅडवर जाऊन आदळला आणि खलील अहमदने पंचांच्या निर्णयापूर्वी विकेट सेलिब्रेट करण्यासाठी धावत गेला. पण विराटला खात्री होती की तो बाद नव्हता. तर धोनीनेही ऋतुराज गायकवाडला रिव्ह्यू घेण्यास सांगितले. रिव्ह्यूमध्ये बॅटला चेंडू न लागल्याचे दिसले, पण बॉल ट्रॅकिंगमध्ये चेंडू पिचिंग आऊटसाईड ऑफ असल्याने विराट नाबाद राहिला.
त्याच षटकातील तिसरा चेंडू खलील अहमदने बाऊन्सर टाकला, जो कोहलीने पूल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटला लागला नाही. यानंतर फॉलो थ्रू वर खलील कोहलीच्या अगदी जवळ आला आणि बराच वेळ त्याच्याकडे पाहत राहिला. यानंतर विराटनेही खलीलकडे रागाने पाहिले. विराट सामन्यानंतर खलीलला याच घटनेची आठवण करून देत होता, असे चाहते म्हणत आहेत. याशिवाय विराट खलील म्हणताना दिसतोय की ‘पुढच्या वेळेस तू बघ फक्त कसे फटके खेळतो, तू ये फक्त पुढच्या वेळेस… ‘ असं म्हणत विराटने खलील खुलं आव्हान दिलं आहे. सीएसकेचा आरसीबीशी या मोसमात पुन्हा एकदा भिडताना दिसणार आहे. हा पुढील सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीच्या घरच्या मैदानावर ३ मे ला होणार आहे.
विराट कोहली खलील अहमदला रागाच्या भरात सुनावत असताना खलील अहमद मात्र विराट कोहलीची समजूत काढताना दिसत आहे. सुरूवातीला विराटचं बोलणं ऐकून खलील हसू लागतो आणि नंतर मैदानावर नेमकं काय घडलं हे खलील त्याला सांगताना व्हीडिओमध्ये दिसत आहे. विराटचा सामन्यानंतरचा हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. याशिवाय सामन्यानंतर हात मिळवताना देखील विराट कोहली आणि खलील अहमद यांच्यात बाचाबाची होताना दिसली. ज्याचा व्हीडिओ देखील समोर येत आहे.
A small heat up between Kohli and khaleel ahmed after the match ? pic.twitter.com/ai9FOo23AF
— arku. (@worshipping_45) March 29, 2025
Virat be lyk – next match chinnaswamy lo kanpadra nuvu kodaka .. ??
— VARMA (@AjjjuVarma) March 29, 2025
Khaleel ahmed gadiki pant jaripodi odiley pic.twitter.com/MmphDbCUra
विराट कोहलीला या सामन्यात ३० चेंडूंचा सामना करताना केवळ ३१ धावा करता आल्या. यादरम्यान त्याने १०३ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आणि २ चौकार आणि १ षटकार खेचला. मात्र, मोसमातील पहिल्या सामन्यात विराटने शानदार खेळी करत केकेआरविरुद्ध नाबाद अर्धशतक झळकावत संघाला विजयाकडे नेले होते.