Virat Kohli Video Goes Viral On Social Media : आयपीएल २०२३ चा ५० वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरु आहे. आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, सामना सुरु होण्याआधी मैदानात एक जबरदस्त दृष्य पाहायला मिळालं. संपूर्ण क्रीडाविश्वात नंबर वन फलंदाज म्हणून ठसा उमटवलेल्या विराट कोहलीनं त्याचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांच्या पाय धरले आणि आशिर्वाद घेतला. विराट कोहलीचा हा जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चाहते प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत.
….म्हणून विराट कोहलीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
सामना सुरु होण्यापूर्वी विराट कोहलीने बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांचे पाय धरले. मैदानात राजकुमार शर्मा दिसताच विराट त्यांच्याजवळ गेला आणि त्याने शर्मा यांचा आशिर्वाद घेतला. त्यानंतर त्यांच्यासोबत विराटने चर्चा केली. हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून चाहत्यांनाही विराटचा हा व्हिडीओ खूप आवडला आहे.
इथे पाहा व्हिडीओ
विराट कोहलीचा आयपीएलमध्ये धमाका
विराट कोहलीने दिल्ली कॅपिटल्सविरोधात सुरु असलेल्या सामन्यात १२ धावांवर पोहोचताच आयपीएलमध्ये ७००० धावा करणारा पहिला फलंदाज बनला आहे. अशी चमकदार कामगिरी करणारा विराट कोलही इतिहासातील पहिला फलंदाज ठरला आहे. विराटने हा पराक्रम आयपीएल करिअरच्या २२५ व्या इनिंगमध्ये केला. कोहली आयपीएल इतिहासात सर्वात जास्त धावा करणाऱ्या लिस्टमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर शिखर धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिखरने ६५३६ धावा केल्या आहेत.