Virat Kohli had decided as a child to marry an actress: आयपीएल २०२३ मध्ये आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. तो उत्कृष्ट खेळी करत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कायम आहे. अनेकदा चर्चेत राहणारा कोहली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता त्याच्या बालपणीच्या मित्राच्या आईने कोहलीबद्दल अनेक खुलासे केले आहेत. आरसीबीने विराटच्या मित्राची आई आणि बालपणीच्या प्रशिक्षकासोबतच्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
विराटने लहानपणीच अभिनेत्रीशी लग्न करायचे ठरवले होते –
आरसीबीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विराटचे पहिले प्रशिक्षक राजकुमार शर्मा, बालपणीचा मित्र शलज आणि त्याची आई यांच्याशी झालेला संवाद दाखवण्यात आला आहे. दोघांनी कोहलीशी संबंधित अगोदर कधी न ऐकलेल्या गोष्टी शेअर केल्या आहेत. शलजची आई नेहा यांनी सांगितले की, “माझा मुलगा आणि विराट राजकुमार शर्माच्या क्रिकेट अकादमीत क्रिकेट शिकण्यासाठी जायचे. त्यावेळी मी दोघांसाठी जेवण बनवायचे. विराटला मी बनवलेले जेवण खूप आवडायचे. एकदा मदन क्रिकेट अकादमीमध्ये मॅच सुरू होती. खेळले. तिथे एका जाहिरातीचे पोस्टर चिकटवले होते. ते पोस्टर पाहून विराट म्हणाला होता की, एक दिवस मी मोठा माणूस होईन आणि कोणत्या तरी अभिनेत्रीशी लग्न करेन.”
विराटमध्ये विशेष प्रतिभा आहे –
शलजची आई म्हणाली, “राजकुमार सरांच्या अकादमीत मी विराटला पहिल्यांदा पाहिलं. मी त्यांच्यासाठी रोज जेवण घेऊन जायची. काय बनवायचं आणि आणायचं हे विराट मला आधीच सांगायचा. मी जेव्हा जेवण घ्यायची, तेव्हा तो सर्वात पहिल्यांदा घ्यायचा.” त्याचवेळी विराटचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी कोहली बालपणात कसा होता हे सांगितले. ते म्हणाले, “१३ मे १९९८ रोजी तो वडील आणि भावासोबत आला होता. काही दिवसांतच आम्हाला कळले की त्यांच्यात एक विशेष प्रतिभा आहे. तो खूप खोडकर आणि सक्रिय होता. त्याला सर्व काही करायचे होते. आणि तो सुरुवातीपासून खूप कष्टाळू होता आणि त्याच्यात खूप आत्मविश्वासही होता.”
हेही वाचा – IPL 2023 RR vs GT: ‘अफगाणिस्तानमध्ये १००० हून अधिक…’; राजस्थानविरुद्धच्या विजयानंतर राशिद खानच मोठं वक्तव्य
आयपीएल २०२३ मध्ये विराटने आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ९ डावात ४५.५० च्या सरासरीने आणि १३७.८८ च्या स्ट्राईक रेटने ३६४ धावा केल्या आहेत. विराट कोहवलीने आपल्या संपूर्ण आयपीएल कारकीर्दीत आरसीबीसाठी खेळताना ६९८८ धावा केल्या आहे. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.