Virat Kohli’s Controversy With Lucknow Players:आयपीएल २०२३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यातील सामन्यात विराट कोहली खूपच आक्रमक दिसत होता. सामन्यादरम्यान अनेक खेळाडूंसोबत त्याचा वाद झाला. नवीन उल हक याच्यापासून वादाची सुरूवात झाली. यानंतर तो अमित मिश्रा आणि गौतम गंभीर यांच्याशीही भिडला. अखेर लोकेश राहुल आणि इतर खेळाडूंनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटली. त्यानंतर विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, जी सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या सामन्यानंतर विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे, जी त्याचे स्पष्टीकरण म्हणून पाहिले जात आहे. या स्टोरी लिहिले आहे की “आपण जे ऐकतो ते तथ्य नसून मत असते. आपण जे पाहतो ते तथ्य नसून एक दृष्टीकोण असतो.” यासोबतच विराटने खाली मार्कस ऑरेलियसचे नावही लिहिले आहे, ज्यावरून हे वाक्य माजी रोमन सम्राट मार्कस ऑरेलियसचे असल्याचे दिसून येते. याशिवाय विराट कोहलीने आपला डीपीही बदलला आहे. नवीन डीपीमध्ये तो पत्नी अनुष्कासोबत दिसत आहे.

When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Virat Kohli's Controversy: आरसीबी आणि लखनऊ यांच्यातील सामन्यात विराट कोहलीचा अनेक खेळाडूंसोबत वाद झाला. या वादानंतर विराट कोहलीने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे, जी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
विराट कोहलीची इन्स्टा स्टोरी

काय घडलं मॅचमध्ये?

लखनऊच्या डावाच्या १७ व्या षटकात विराट स्टंपच्या मागून धावत आला आणि नवीनला काहीतरी इशारा करत म्हणाला. येथून संपूर्ण प्रकरणाला सुरुवात झाली. त्यावर अफगाणिस्तानचा नवीनही त्याच्या जवळ आला आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादादरम्यान विराटनेही आपल्या बुटाकडे बोट दाखवत इशारा केला, तसेच त्यातून माती काढली. जणू तो स्टेटसबद्दल बोलत होता. बाकीच्या खेळाडूंनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कोहली आणि अमित मिश्रा यांच्यातही वाद झाला.

हेही वाचा – Virat Kohli Controversies: आधी कुंबळे…मग गांगुली…आता अमित मिश्रा आणि गौतम गंभीर, कोहली वरिष्ठ खेळाडूंसोबतच्या वादावरून होतोय ट्रोल

बंगळुरूच्या विजयानंतर दोन्ही संघांचे खेळाडू हस्तांदोलन करत असताना कोहली नवीनला काहीतरी म्हणाला. येथेही दोघांमध्ये वादावादी झाली. यानंतर कोहली सीमेवर चालत असताना तो लखनऊच्या काइल मेयर्सशी बोलू लागला. त्यानंतर गंभीर येतो आणि मेयर्सला विराटपासून दूर घेऊन जातो आणि त्याच्याशी बोलण्यास नकार देतो. यानंतर गंभीर काहीतरी बोलतो, ज्यावर कोहली त्याला जवळ बोलावतो आणि दोघामध्ये चर्चा सुरु असताना वादावादी होते.

Story img Loader