Mayank Agarwal Out Of Form In IPL 2023 : सनरायझर्स हैद्राबादचा धडाकेबाज फलंदाज मयंक अग्रवाल यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये धावांसाठी संघर्ष करत आहे. मागील सीजनमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या मयंकला आयपीएल २०२३ मध्ये धावांचा सूर गवसला नाहीय. प्रत्येक सामन्यात स्वस्तात माघारी परतणाऱ्या मयंक अग्रवालच्या फॉर्मबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अशातच टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने सनरायझर्स हैद्राबादचा सलामी फलंदाज मयंक अग्रवालबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटलं की, मयंक अग्रवालला सनरायझर्स हैद्राबादच्या टीममध्ये सतत संधी दिली पाहिजे. मयंक अग्रवालच्या जागेवर कोणत्याही प्रकारची रिप्लेसमेंट होऊ शकत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मयंक अग्रवालसाठी आयपीएलचा १६ वा हंगाम खूप खराब गेला आहे. प्रत्येक सामन्यात तो फ्लॉप झाला आहे. ओपनिंगपासून मिडल ऑर्डरपर्यंत प्रत्येक जागेवर त्याला खेळवण्यात आलं. पण आतापर्यंत मयंक अग्रवालने खूप चांगली कामगिरी केली नाहीय. याबाबत वीरेंद्र सेहवागने प्रतिक्रिया दिली आहे. वीरेंद्र सेहवागच्या म्हणण्यानुसार, मयंक अग्रवालला सतत संधी दिली पाहिजे. कारण तो खूप चांगला फलंदाज आहे.

नक्की वाचा – लिटन दास IPL मधून बाहेर पण गोलंदाजांना घाम फुटणार, KKR च्या पलटणमध्ये ‘या’ स्फोटक फलंदाजाची एन्ट्री

क्रिकबजशी बोलताना सेहवागने म्हटलं, सनरायझर्स हैद्राबादच्या टीमने मयंक अग्रवालला महागड्या बोलीवर खरेदी केलं होतं. त्याला संघाचा कर्णधार केलं जाईल, असं सुरुवातीला वाटत होतं. आताच्या क्षणी सनरायझर्सकडे असा फलंदाज नाहीय जो मयंकला रिप्लेस करेल. त्याला थोडा आत्मविश्वास दिला पाहिजे. तो फॉर्ममध्ये येऊ शकतो आणि सनरायझर्स हैद्राबादला एक दोन सामन्यांमध्ये विजय मिळवून देऊ शकतो.

गुरुवारी केकेआर आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. या सीजनचा हा ४७ वा सामना असणार आहे. या दोन्ही संघाची परिस्थिती आतापर्यंत सारखीच राहिली आहे. हैद्राबादने ८ सामन्यांपैकी ३ सामन्यांमध्ये विजय संपादन केलं आहे. तर केकेआरच्या संघाने ९ पैकी ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. अशाप्रकारे दोन्ही संघाची खराब परिस्थिती आहे. या सामन्यात जिंकणं दोन्ही संघांसाठी खूप गरजेचं आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virender sehwag believe in mayank agarwal batting saying sunrisers hyderabad should always give a chance to mayank agarwal ipl 2023 nss