Virender Sehwag On Rohit Sharma Form In IPL 2023 : भारताचा माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागने रोहित शर्माच्या फॉर्मबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रोहत शर्माच्या फलंदाजीच्या शैलीत कोणत्याच प्रकारची कमी नाहीय. काही मानसिक गोष्टींमुळं रोहितचा फॉर्म खराब झाला आहे. रोहितने यंदाच्या आयपीएल हंगामात १८.३९ च्या सरासरीनं आणि १२६.८९ च्या स्ट्राईक रेटनं फक्त १८४ धावा केल्या आहेत. मागील दोन सामन्यात तर रोहित शून्यावर बाद झाला. रोहित शर्मा गोलंदाजांशी नाही तर स्वत:शीच लढत आहे. मानसिक परिस्थितींचा तो सामना करत आहे. तो गोंधळलेल्या स्थितीत आहे. ज्या दिवशी तो यातून बाहेर पडेल, तो मागील सर्व सामन्यांची भरपाई करेल, अशी प्रतिक्रिया वीरेंद्र सेहवागने दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आयपीएलमध्ये पाचवेळा जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएल हंगामात दहा सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये विजय संपादन केलं आहे. मागील सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबईचा सहा विकेट्स राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज अॅरोन फिंचने म्हटलं की, मुंबईचा सलामीवीर फलंदाज गोंधळलेला आहे. त्याने चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडकडून शिकायला पाहिजे. मुंबईचे सलामीचे फलंदाज खूप गोंधळलेले असल्याने खराब शॉट खेळण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याचा ते प्रयत्न करतात. त्यांना गायकवाडकडून शिकणं गरजेचं आहे. जो शांत राहून स्लॉटमधल्या चेंडूची प्रतिक्षा करतो.

नक्की वाचा – ‘१७५ शतक अन् ५९६७९ धावा…’, किंग कोहली अन् क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांच्यात काय चर्चा झाली? पाहा Video

रोहितचा फॉर्म खराब सुरु असून विराट कोहलीने या सीजनमध्ये आतापर्यंत ४१९ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज इमरान ताहीरने म्हटलं की, विराटला नेहमीच धावांची भूख लागलेली असते. तुम्ही एक किंवा दोन सत्रात धावा करू शकता. पण लगातार १५ सीजनपासून धावा करणं म्हणजे एकप्रकारे त्या खेळाडूच्या मेहनतीचं फळच आहे.