Virender Sehwag Criticizes Sam Curran: शिखर धवनच्या अनुपस्थितीत पंजाब किंग्जचा अष्टपैलू खेळाडू सॅम करणने संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जचा संघ लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव करण्यात यशस्वी ठरला होता, मात्र त्यानंतर त्याने आरसीबीविरुद्ध कर्णधार म्हणून काही निर्णय घेताना तो अडखळताना दिसला. त्यामुळे यावर आता माजी कर्णधार वीरेंद्र सेहवागने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोर त्याने इतर काही गोष्टी निदर्शनास आणून दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१८ कोटी देऊन तुम्ही अनुभव विकत घेऊ शकत नाही –

४४ वर्षीय वीरेंद्र सेहवाग क्रिकबजवर बोलताना म्हणाला की, “मला सॅम करणकडून आरसीबीविरुद्ध चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा होती, पण दुर्दैवाने तसे झाले नाही. सेहवाग पुढे म्हणाला की त्याने अधिक परिपक्वता दाखवून खेळाला खोलवर नेले पाहिजे होते, परंतु त्याने अत्यंत वाईट पद्धतीने त्याची विकेट गमावली.”

सेहवागने सॅम कुरनने रनिंग बिटवीन द विकेट्समध्ये दाखवलेल्या आळशीपणावर टीका केली. तो म्हणाला की, १८ कोटी रुपयांमध्ये पंजाब त्यांना आवश्यक असलेला अनुभव विकत घेऊ शकणार नाही. आरसीबीविरुद्ध सॅम करण १० धावांवर बाद झाला आणि या सामन्यात पंजाब संघाचा २४ धावांनी पराभव झाला. पंजाब फ्रँचायझीने सॅम करणला यंदा १८ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. तसेच तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे.

हेही वाचा – Sachin Q&A Session: अर्जुनबरोबर खेळण्याची इच्छा व्यक्त करताना…, सचिनने विराट कोहलीबद्दल केला मोठा खुलासा

सेहवाग पुढे म्हणाला की, ”त्याला १८ कोटी रुपयांना विकत घेतले आहे, त्यामुळे तो आम्हाला सामना जिंकून देईल. पण या गोष्टीचा अनुभव त्याला अजून आलेला नाही. सॅम करण हा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे, पण तुम्ही १८ कोटी रुपयांत अनुभव घेऊ शकत नाही. ते तेव्हाच येते जेव्हा तुम्ही खेळता, जेव्हा उन्हात खेळल्यामुळे तुमचे केस पांढरे होतात. त्याने अतिशय वाईट धाव घेण्याचा प्रयत्न केला, ज्याची अजिबात गरज नव्हती. तुम्ही कर्णधार आहात, तुम्हाला तिथे थांबण्याची गरज आहे. जेणेकरून सामना शेवटच्या ओव्हर्सपर्यंत नेता येईल, पण पुन्हा एकदा अननुभवीपणा संघाला महागात पडला.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virender sehwag criticized sam curran and said that experience cannot be bought for rs 18 crore vbm
Show comments