Virender Sehwag Big Statement About MS Dhoni Future : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एम एस धोनीचा यंदाचा आयपीएल हंगाम शेवटचा आहे? या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालं नाही. परंतु, धोनीनं सीएसकेसोबत राहणार असल्याचं अनेकदा म्हटलं आहे. यावर्षी इम्पॅक्ट प्लेयरचा नियमही लागू करण्यात आला आहे. त्यामुळे धोनी यापुढेही अनेक वर्ष आयपीएल खेळू शकतो. तसंच ब्रावोनेही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. हा नियम सुरु झाल्यामुळं धोनी आयपीएलमध्ये आणखी अनेक वर्ष खेळू शकतो. अशातच आता भारताचा माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागने धोनीच्या भविष्याबाबत भाष्य केलं आहे. धोनीसाठी इम्पॅक्ट प्लेयरचा नियम लागू होत नाही. कारण जो इम्पॅक्ट प्लेयर असेल, त्या एकतर फलंदाजी करावी लागेल किंवा गोलंदाजी, पण कॅप्टन्सी करू शकत नाही. पूर्ण २० षटक तो खेळाडू मैदानावर राहू शकत नाही, असं सेहवागनं म्हटलं आहे.
क्रिकबझशी बोलताना सेहवाग पुढे म्हणाला, धोनीने या वर्षी खूप जास्त फलंदाजी केली नाहीय. तो शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजी करायला येतो आणि वेगाने धावा काढतो. हाच धोनीचा प्लॅन राहिला आहे. धोनी जर पुढे खेळला, तर कर्णधार म्हणूनच खेळू शकतो. त्यामुले धोनीसाठी इम्पॅक्ट प्लेयरचा नियम लागू होत नाही. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळावं लागेल की मेन्टॉर म्हणून संघासोबत राहावं लागेल. हे पाहावं लागेल. हातात छडी घेऊन संघाच्या कामगिरीवर लक्ष ठेवणार आणि मार्गदर्शन करणार.
धोनी आयपीएल खेळत आहे तो फक्त नेतृत्व करण्यासाठी. कारण कॅप्टन्सी करण्यासाठी त्याला मैदानाच्या आत राहावं लागेल. जर माही कर्णधार नसेल, तर इम्पॅक्ट प्लेयर म्हणूनही खेळणार नाही. तो खेळेल किंवा मेंटॉर किंवा डायरेक्टर ऑफ क्रिकेट म्हणूनच सीएसकेसोबत असेल, असंही सेहवागनं म्हटलं आहे. धोनी यावर्षीच्या आयपीएल हंगामात गुडघ्याच्या दुखापतीमुळं त्रस्त असल्याचंही पाहायला मिळालं. सामन्यादरम्यान धोनीनं गुडघ्याला पट्टी लावल्याचंही समोर आलं. अशातच धोनी पुढील वर्षी आयपीएल खेळणार कि नाही, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.