Virendra Sehwag on Umran Malik: आयपीएल २०२३चे लीग सामने संपले आहेत. या स्पर्धेचा भाग असलेल्या सनरायझर्स हैदराबादने गुणतालिकेत १०व्या स्थानावर राहून या हंगामाचा शेवट केला. मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळलेल्या शेवटच्या सामन्यातही संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात हैदराबादकडून अतिशय खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. संघाचे अनेक गोलंदाज अपयशी दिसले. यामध्ये वेगवान गोलंदाज उमरान मलिकचाही सहभाग होता. भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग यंदाच्या मोसमात उमरानच्या कामगिरीवर पूर्णपणे नाराज दिसला.

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात उमरान मलिकची गोलंदाजी पुन्हा एकदा खराब झाली. उमरानने ३ षटके टाकत ४१ धावा दिल्या. उमरानने संपूर्ण मोसमात आश्चर्यकारक गोलंदाजी केली. गेल्या मोसमात जो गोलंदाज आपल्या जबरदस्त गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना अडचणीत आणण्यात यशस्वी ठरला, त्या गोलंदाजाविरुद्ध फलंदाजांना या हंगामात सहज धावा करता येत होत्या. उमरानने गेल्या मोसमात २२ विकेट्स घेतल्या होत्या. या हंगामात या गोलंदाजाने ८ सामने खेळले आणि त्याला केवळ ५ विकेट्स घेता आल्या. उमरानच्या चुकीच्या कामगिरीवर आता टीका होत आहे. मुंबईकडून झालेल्या पराभवानंतर क्रिकबझवर बोलताना सेहवागने  उमरानच्या खराब गोलंदाजीवर टीका केली आणि खास सल्लाही दिला आहे.

Bollywood Artists News, Marathi news
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच नाही तर सलमान खान, रवीना टंडन यांच्यासह ‘या’ कलाकारांवरही झाला होता हल्ला
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Saif Ali Khan And Arvind Kejriwal
Saif Ali Khan : “गुजरातच्या तुरुंगात बसलेला गुंड…” सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेत केजरीवालांकडून भाजपा लक्ष्य
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
police reaction on saif ali khan attack
“त्याच्या गृहसेविकेबरोबर वाद…”, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांची पहिली प्रतिक्रिया
Saif Ali Khan attacked by intruder at bandra home
अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, वांद्रेतील घरात मध्यरात्री घडली घटना
Gautam Gambhir Angry on Morne Morkel in Australia for turning up late at training IND vs AUS
Team India: गौतम गंभीर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मॉर्ने मॉर्कलवर संतापला, नेमकं काय घडलं होतं? प्रकरण आलं समोर
yograj singh criticise aamir khan movie
आमिर खानच्या ‘त्या’ सिनेमाला युवराज सिंगच्या वडिलांनी म्हटले ‘अतिशय फालतू’; बॉलीवूड सिनेमांवरही केली टीका, म्हणाले…

हेही वाचा: IPL2023: “मी रिटायरमेंट मागे घेत आहे…” विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर ख्रिस गेलचे आश्चर्यचकित विधान

मुंबई इंडियन्सच्या सामन्यानंतर वीरेंद्र सेहवाग उमरान मलिकवर भडकला. तो म्हणाला की, “उमरान डेल स्टेनसोबत एवढा काळ घालवला पण त्याला त्याच्याकडून काहीच शिकता आले ही फार मोठी शोकांतिका आहे.” क्रिकबझवर बोलताना वीरेंद्र सेहवाग पुढे म्हणाला, “उमरानला वरिष्ठांकडून शिकून घेणे गरजेचे होते. कर्णधार त्याला लाँग ऑफ आणि लाँग ऑन ठेवण्यास सांगू शकतो. गोष्ट अशी होती की तुम्ही धावांचा प्रवाह रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरलात. गोलंदाज ज्यावेळी स्वतः फिल्डिंग लावतो किंवा कर्णधाराकडे मागणी करतो त्यावेळी तो लयीत असतो. जेव्हा कर्णधार फिल्डिंग लावतो तेव्हा गोलंदाजावर संघाचा विश्वास नसतो.”

हेही वाचा: WTC Final: WTC फायनलमध्ये भारतीय संघाची जर्सी दिसणार ‘या’ नव्या लूकमध्ये, BCCI सचिव जय शाह यांची मोठी घोषणा

डेल स्टेनसोबत राहूनही उमरान शिकत नाही: सेहवाग

सेहवाग पुढे म्हणाला, “जर तो दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज असेल तर मी समजू शकतो की त्याला फुल लेंथ गोलंदाजी करायची नाही. पण उमरान मलिकची समस्या अशी आहे की तो त्याची लाईन आणि लेंथ बदलत राहतो. त्याला अजून एवढा जास्त अनुभव नाही. उमरानने डेल स्टेनसोबत खूप काम केले असते तर त्याला त्याची गोलंदाजीत बदल करून सुधार करता आला असता. स्टेनसोबत इतके दिवस काम करून आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली शिकत असूनही तो गेल्या वर्षी त्याच चुका करत आहे.”

Story img Loader