Virendra Sehwag Statement On MS Dhoni Retirement : लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात पावसाने खोडा घातल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आलं. या सामन्याच्या नाणेफेकी दरम्यान धोनीनं पुन्हा एकदा आयपीएलच्या निवृत्तीबाबत भाष्य केलं. धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. याचदरम्यान, नाणेफेक सुरु असताना प्रेजेंटर डॅनी मॉरिसनने धोनीला विचारलं, तुम्ही तुमचं शेवटचं आयपीएल सीजन एन्जॉय करत आहात? यावर धोनीनं प्रतिक्रिया देत म्हटलं, “हे माझं शेवटचं आयपीएल सीजन आहे, असं तुम्ही म्हणत आहात, मी नाही…”
धोनीने दिलेल्या प्रतिक्रियेनंतर टीम इंडियाचचा माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागने रिअॅक्ट केलं आहे. सेहवागने धोनीच्या निवृत्तीबाबत त्याचं मत व्यक्त केलं आहे. सेहवाग म्हणाला, “धोनीचं हे शेवटचं आयपीएल सीजन नाहीय. मग धोनीला अशाप्रकारचे प्रश्न का विचारले जात आहेत. त्यांनी या सर्व प्रश्नांना नकार दिला पाहिजे. हा खेळाडूचा कॉल असला पाहिजे. जरी कोणत्याही खेळाडूचं शेवटचं आयपीएल असेल, तर तो त्यांचा निर्णय आहे. मी अशाप्रकारचे प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात आहे. “
माजी क्रिकेटर सेहवागने पुढं म्हटलं, “अशाप्रकारचे प्रश्न का विचारले जातात. मला हेच समजत नाहीय. जेव्हा धोनीला वाटेल हे त्याचं शेवटचं आयपीएल आहे तेव्हा तो यापासून वेगळा होईल. धोनी स्वत: याबाबत सांगेल.” जेव्हापासून यंदाचा आयपीएल हंगाम सुरु झाला आहे, तेव्हापासून चाहते आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गज धोनीच्या आयपीएल निवृत्तीबाबत नेहमी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.