Sachin Tendulkar vs Virender Sehwag : भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागला सामन्यादरम्यान आक्रमक फलंदाजीसोबतच विनोदी वृत्ती करण्यास ओळखलं जायचं. सामन्यात षटक सुरु असतानात स्ट्राईक घेण्याआधी सेहवागला गाणं गायला खूप आवडायचं. अशाच प्रकारचा एक रोमांचक किस्सा सेहवागने कॉमेंट्री करत असताना सांगितला आहे. वीरेंद्र सेहवागच्या अशा वागणुकीला सचिन तेंडुलकरही वैतागला होता. आयपीएलच्या सामन्यादरम्यान कॉमेंट्री करत असताना सहवागने याबाबत खुलासा केला. सेहवाग म्हणाला की, मला फलंदाजी करत असताना किशोर कुमार यांचं गाणं गायला खूप आवडायचं. माझ्या या सवयीमुळे सचिन खूप संतापला होता.
सेहवाग पुढे म्हणाला, “२०११ विश्वकपच्या दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध आम्ही दोघेही एकमेकांसोबत फलंदाजी करत होतो. त्याचदरम्यान, आम्ही दोघांनी चांगली भागिदारी केली होती. सचिन त्यावेशी जबरदस्त फॉर्ममध्ये होता. अशातच माझ्या सवयीप्रमाणे मी षटक सुरु असताना गाणं गात होतो. त्यानंतर एक दोन षटक संपले. तसंच सचिनला षटकांमध्ये चर्चा करणं पसंत होतं. त्याला गोलंदाजीच्या रणनितीवर चर्चा करायला आवडायची. पण मी माझ्या धुंदीत असायचो आणि गाणं गात असत. माझ्या या सवीयमुळे सचिनने नाराजी व्यक्त करत मला पाठीमागे बॅट मारली आणि म्हटलं, गाणं बंद कर, नाहीतर तुला किशोर कुमार बनवेल….”
यावर मी म्हणालो, पाजी आपण खूप चांगलं खेळत आहोत. यामध्ये बोलायची काहीच गरज नाहीय. आपलं आपलं काम करत आहोत. सेहवागने सांगितलं की, त्यावेळी आम्ही २० षटकांमध्ये १४० धावांची भागिदारी केली होती. आम्ही चांगलं खेळत होतो. तसंच सेहवागने आयपीएलमधील तीन आवडत्या फलंदाजांबाबतही खुला केला. सेहवागने रिंकू सिंग, प्रभसिमरन सिंग आणि तिलक वर्मा यांचं नाव घेतलं.