Virender Sehwag Says Team David Gives Rohit Sharma Perfect Birthday Gift: वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२३ च्या ४२ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने शानदार विजय नोंदवला. मुंबईने राजस्थान रॉयल्सचा ६ गडी राखून पराभव केला. विशेष म्हणजे रोहित शर्माच्या वाढदिवसाला हा सामना मुंबईने जिंकला. मुंबईच्या विजयात टीम डेव्हिडचा मोलाचा वाटा होता. त्याने १४ चेंडूत नाबाद ४५ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. यावर माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग ट्विट करत म्हणाला, डेव्हिडने रोहितला परफेक्ट बर्थडे गिफ्ट दिले.
राजस्थानविरुद्धचा रोमांचक सामना मुंबईने जिंकल्यानंतर वीरेंद्र सेहवागने टीम डेव्हिडचे कौतुक केले. तो ट्विट करत म्हणाला, ” टीम डेव्हिडने रोहितला परफेक्ट बर्थडे गिफ्ट दिले. मुंबई इंडियन्सने केलेला धावांचा पाठलाग उत्कृष्ट होता. या हंगामात शेवटच्या षटकांमध्ये फिनिशिंग पाहून आनंद झाला.”
मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर रोहित शर्माने वाढदिवसानिमित्त केक कापला. यावेळी मुंबईचे सर्व खेळाडू व सपोर्ट स्टाफ उपस्थित होता. मुंबईने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये रोहित केक कापताना दिसत आहे. यासोबतच मुंबईचे चाहते आपल्या संघाला प्रोत्साहन देताना दिसत आहेत.
सामन्याबद्दल बोलायचे तर आयपीएलच्या १००० व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना ७ विकेट गमावत २१२ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने १९.३ षटकांत २१४ धावा करत सामना जिंकला. मुंबईसाठी टीम डेव्हिडने २० व्या षटकातील पहिल्या तीन चेंडूत सलग तीन षटकार मारून सामना संपवला. राजस्थानसाठी यशस्वी जैस्वालची १२४ धावांची खेळी व्यर्थ गेली. त्याचवेळी मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ५५ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त टीम डेव्हिडने ४५ आणि कॅमेरून ग्रीनने ४४ धावा केल्या.
यशस्वी जैस्वालचे शानदार शतक –
यशस्वी जैस्वाल आयपीएल २०३ मध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने नऊ डावांमध्ये ४७.५६ च्या सरासरीने ४२८ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेटही १५९.७० आहे. या मोसमात आतापर्यंत त्याने ५६ चौकार आणि १८ षटकार मारले आहेत. या मोसमातही तो सध्या सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असून ऑरेंज कॅप त्याच्या नावावर आहे. आयपीएलच्या १००० व्या सामन्यात जैस्वालने मुंबई इंडियन्सविरुद्ध १२४ धावांची खेळी केली. आयपीएलमधील कोणत्याही फलंदाजाने राजस्थानकडून खेळताना केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी बटलरनेही १२४ धावांची खेळी केली होती.