Virender Sehwag slams Prithvi Shaw: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघ सलग दोन सामने हरला आहे. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नर संघाचे नेतृत्व करत आहे. पृथ्वी शॉने पहिल्या दोन सामन्यात वॉर्नरसोबत डावाची सुरुवात केली. शॉ पहिल्या दोन सामन्यात फ्लॉप ठरला आहे. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध शॉला मार्क वुडने १२ धावांवर बाद केले होते. त्यानंतर गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीने त्याला ७ धावांवर बाद केले. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग शॉ ज्या प्रकारे आउट होत आहे, त्यावरून तो अजिबात खूश नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, सेहवागने क्रिकबझवर शॉच्या कामगिरीवर निशाणा साधला आहे. वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “पृथ्वी शॉनेही आपल्या चुकांमधून शिकले पाहिजे. शुबमन गिलकडे बघा, जो त्याच्यासोबत अंडर-१९ क्रिकेट खेळला आणि आता भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळत आहे. पण शॉ अजूनही आयपीएलमध्ये संघर्ष करत आहे. ऋतुराज गायकवाडनेही आयपीएलच्या एका मोसमात ६०० धावा केल्या आहेत.”

पृथ्वी शॉच्या एकूण आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याने ६५ डावांत २४.७२च्या सरासरीने एकूण १६०७ धावा केल्या आहेत. शॉच्या खात्यात एकूण १२ आयपीएल अर्धशतकं आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १४७.३ आहे. परंतु मोठी खेळी न खेळणे हे त्याच्यासाठी आणि त्याच्या फ्रँचायझी संघासाठी चिंतेचे कारण आहे. शॉची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या ९९ आहे.

हेही वाचा – NZ vs SL 2nd T20: अ‍ॅडम मिल्नेचा कहर! वेगवान चेंडू टाकत पथुम निसांकाच्या बॅटच्या उडवल्या चिंधड्या, पाहा VIDEO

अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना ८ गडी गमावून १६२ धावा केल्या होत्या. डीसीने पृथ्वी शॉ आणि मिचेल मार्शच्या विकेट्स ३७ च्या स्कोअरपर्यंत गमावल्या. यानंतर डेव्हिड वॉर्नरने ३७ धावांची खेळी करत संघाला सांभाळण्याचा प्रयत्न केला. शेवटी अक्षर पटेलने २२ चेंडूत ३६ धावांची खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात संघाने साई सुदर्शनच्या ६२ धावांच्या खेळीमुळे हे लक्ष्य गाठले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virender sehwag slams prithvi shaw gives example of rituraj and shubman vbm