Virender Sehwag on Yuzvendra Chahal : आयपीएलच्या सतराव्या हंगामातील १९ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सवाईमान सिंग स्टेडियमवर रॉयल चॅलेंजेस बंगळुरूचा ६ गडी राखून पराभव करत सलग चौथ्या विजयाची नोंद केली. यासह राजस्थान संघ ८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. राजस्थानच्या युजवेंद्र चहलने या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्याने एकूण २ विकेट्स आपल्या नावावर केल्या. यानंतर युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीचे कौतुक करताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, आम्हाला त्याला विश्वचषकात बघायचे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रिकबझवर बोलताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “युजवेंद्र चहल हा टी-२० क्रिकेटचा महान गोलंदाज आहे. मात्र तो विश्वचषक खेळला नाही. टी-20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. तो संघाबाहेर आहे. चहलचा विचार केला तर तो संघात दिसत नाही. त्याने आयपीएलमध्ये आपला क्लास दाखवला आणि त्याची गोलंदाजी आरसीबीच्या पराभवाचे कारण बनली. चहल फलंदाजांच्या डोक्यानुसार गोलंदाजी करतो आणि शानदार चेंडू टाकतो. आम्ही त्याला ‘सुखा बॉडीगार्ड’ म्हणतो. मला आशा आहे की आगामी विश्वचषकात त्याला संधी मिळेल.”

आरआरसाठी तिसरा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होण्याची संधी –

युजवेंद्र चहलने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात एकूण २ विकेट्स घेतल्या. त्याने फाफ डु प्लेसिस आणि नंतर कॅमेरून ग्रीनला बाद केले. चहल आता गुजरात टायटन्सविरुद्ध खेळताना दिसणार आहे. या सामन्यात त्याने ३ विकेट घेतल्यास तो राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीसाठी तिसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही ठरेल. सध्या चहलच्या खात्यात ५६ विकेट जमा आहेत. त्याचवेळी शेन वॉर्नने राजस्थानकडून खेळताना ५८ विकेट्स घेतल्या होत्या. सध्या तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा – LSG vs GT : लखनऊविरुद्धच्या पराभवानंतर शुबमन गिल संतापला; कोणावर फोडले खापर? घ्या जाणून

आयपीएलमध्ये ही कामगिरी करणारा राजस्थान पहिलाच संघ –

आयपीएलच्या इतिहासातील ही सहावी वेळ आहे, जेव्हा एखाद्या संघाने हंगामातील पहिल्या ४ सामन्यात सलग विजय मिळविला आहे. यापूर्वी २०१५ मध्येही राजस्थान रॉयल्सने हंगामातील पहिल्या ४ पैकी ४ सामने जिंकले होते. यासह, राजस्थान रॉयल्स हा आयपीएलच्या इतिहासातील पहिला संघ बनला आहे, ज्याने हंगामाच्या सुरुवातीचे सलग ४ सामने दोनदा जिंकले आहेत. राजस्थान व्यतिरिक्त इतर कोणत्याही संघाला हा पराक्रम दोनदा करता आलेला नाही.

हेही वाचा – IPL 2024 CSK vs KKR : चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी गंभीरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “धोनी हा एक कुशल…”

आयपीएल हंगामातील पहिले सलग ४ सामने जिंकणारे संघ –

२००८ – चेन्नई सुपर किंग्ज<br>२००९ – डेक्कन चार्जर्स
२०१४ – पंजाब किंग्ज<br>२०१५ – राजस्थान रॉयल्स
२०२१ – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
२०२४ – राजस्थान रॉयल्स

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virender sehwag wants to see rajasthan royals spinner yuzvendra chahal play for india in t20 world cup 2024 vbm