Virender Sehwag warns CSK bowlers for MS Dhoni: आयपीएल २०२३ मध्ये, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जचा संघ विजयी मार्गावर परतला आहे. सोमवारी झालेल्या रोमांचक सामन्यात संघाने आरसीबीचा ८ धावांनी पराभव केला. चेन्नईचा या मोसमातील हा तिसरा विजय आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघ विजयाच्या मार्गावर पुढे जात असतानाच, माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागला धोनीवर आयपीएलमध्ये बंदी घातली जाण्याची चिंता सतावत आहे. त्यामुळे त्याने सीएसकेच्या गोलंदाजांना एक इशारा दिला आहे.
चेन्नई संघ सतत अतिरिक्त धावा देत आहे –
सेहवागची ही भीती रास्तही आहे. चेन्नई सुपर किंग्जचा संघ विजयी मार्गावर परतला असला, तरी त्याच्या गोलंदाजांमध्ये शिस्तीचा अभाव अजूनही दिसून येत आहे. संघ प्रत्येक सामन्यात अतिरिक्त धावा देत असल्याने डावाची षटके वेळेवर संपत नाहीत. त्यामुळे कर्णधाराला सतत स्लो ओव्हर रेटचा फटका सहन करावा लागतो. ज्यामुळे त्याच्यावर एक-दोन सामन्यांची बंदी घालण्यात येते.
हेही वाचा – IPL 2023 LSG vs CSK: लखनऊ आणि चेन्नई यांच्यातील सामन्यात मोठा बदल; आता ४ मे ऐवजी ‘या’ दिवशी होणार सामना
सोमवारी आरसीबीविरुद्ध झालेल्या सामन्यात सीएसकेच्या गोलंदाजांनी सहा वाईड चेंडू टाकले. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या एका विकेटच्या पराभवानंतर धोनी म्हणाला होता, ‘गोलंदाजांना नो-बॉल आणि वाईड बॉलवर नियंत्रण ठेवावे लागेल, आम्ही खूप जास्त चेंडू टाकतो, आम्हाला त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा त्यांना नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल. ज्यामध्ये सीएसकेला एका नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळावे लागेल. धोनीचा इशारा या वस्तुस्थितीकडे होता की सतत स्लो ओव्हर रेटसाठी त्याच्यावर बंदी घातली जाऊ शकते.
धोनीवर बंदी येण्याची भीती सेहवागला आहे –
चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांना इशारा देताना सेहवाग क्रिकबझवर म्हणाला, “या सामन्यात धोनी खूश दिसत नव्हता. वाइड्स आणि नो बॉल कमी करण्याची गरज असल्याचे त्याने यापूर्वीही म्हटले आहे. रविवारी त्यांनी सहा वाईड म्हणजेच एक अतिरिक्त षटक टाकले. हे योग्य नाही. मला भीती वाटते की या चुका चेन्नई सुपर किंग्जला धोनीवर बंदी घालण्याच्या परिस्थितीत घेऊन जाऊ शकतात.”
धोनीने आपल्या खेळाडूंना सावध केले होते –
लीगच्या सुरुवातीला लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान धोनीने आपल्या गोलंदाजांना सावध केले होते. त्या सामन्यात चेन्नईने १३ अतिरिक्त चेंडू टाकले होते. तेव्हा धोनी म्हणाला होता, की जर गोलंदाज सुधारले नाहीत, तर तो कर्णधारपद सोडेल आणि संघाला नव्या कर्णधारासोबत खेळावे लागेल. यानंतर संख्या कमी झाली परंतु अद्याप ती पूर्णपणे संपलेली नाही.