Virender Sehwag says about Shubman Gill: गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुबमन गिल सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गिलने सोमवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने ५८ चेंडूत १३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १०१ धावा केल्या. अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम शुबमन गिलला खूप आवडते. भारतीय संघाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने शुबमन गिलच्या शतकी खेळीवर असे विधान केले आहे, जे चाहत्यांना खूप आवडले आहे.

भारतीय संघाचा माजी स्फोटक फलंदाजी वीरेंद्र सेहवागने शुबमन गिलच्या शतकी खेळीचे कौतुक केले. सेहवाग म्हणाला, ‘अशा खेळपट्टीवर गिलने शतक झळकावले जेथे इतर फलंदाजांना खेळण्यात खूप अडचणी येत होत्या. शुबमन गिलने २०२३ मध्ये आतापर्यंत सहा शतके झळकावली आहेत, त्यापैकी तीन शतके या मैदानावर झळकावली आहेत.

Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”
aimim akbaruddin Owaisi marathi news
Akbaruddin Owaisi: “काँग्रेसमुळे मुस्लिमांवर ‘ही’ वेळ”, एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांचा काँग्रेसवर आरोप
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
Sanju Samson's wife reacts to hundred vs Proteas: My forever favourite hero
Sanju Samson : ‘तेरा ध्यान किधर है, तेरा हीरो…’, संजू सॅमसनच्या शतकी खेळीनंतर पत्नी चारुलताच्या इन्स्टा स्टोरीने वेधलं लक्ष
Sanju Samson Revelas Suryakumar Yadav and Gautam Gambhir Support him
Sanju Samson : ‘कारकीर्दीत बरेच चढ-उतार आले, पण…’, शतकी खेळीनंतर संजू सॅमसनने ‘या’ दोन माणसांचे मानले आभार
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”

लव्ह स्टोरीचे रुपांतर लग्नात झाले –

गिलने फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध टी-२०आंतरराष्ट्रीय सामन्यात नाबाद १२६ धावा केल्या होत्या. त्यानंतर नरेंद्र मोदी स्टेडियमवर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने १२८ धावा केल्या होत्या. आता आयपीएलमध्येही त्याने याच मैदानावर पहिले शतक झळकावले.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना वीरू म्हणाला, “कदाचित हा सर्वात मोठा अध्याय आहे. मी म्हणेल की, लव्ह स्टोरीचे रुपांतर लग्नात झाले. गिल पूर्णपणे वेगळ्या ठिकाणी फलंदाजी करत असल्याचे दिसत होते. इतर फलंदाज झगडत असताना तो सहज चौकार मारत होता. शुबमन गिलबद्दल आपण खूप दिवसापासून बोलत आहोत. या वर्षी त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय आणि कसोटीमध्ये शतके ठोकली आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले. आता आयपीएलमध्येही शतक ठोकले.”

हेही वाचा – Gautam Gambhir: नवीन उल हक १९व्या षटकात महागडा ठरल्याने संतापला गंभीर, फोटो होतोय व्हायरल

शुबमन गिलचे शतक आणि मोहम्मद शमी आणि मोहित शर्माच्या घातक गोलंदाजीमुळे गुजरातने हैदराबादवर विजय मिळवला. गुजरातने आयपीएल २०२३ च्या ६२ व्या सामन्यात हैदराबादचा 34 धावांनी पराभव करून प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. गतवर्षीप्रमाणे यंदाही गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे.